Ganam
Andharyatra By Narayan Dharap
Andharyatra By Narayan Dharap
हजारो वर्षांच्या तात्त्विक चिंतनानंतरही मानवाला काल स्वरूप समजलेले नाही. मात्र कालाने त्याच्या अनुभूतीवर घातलेल्या मर्यादा प्रथमपासून स्पष्ट आहेत. मानवाला कालमार्गावरून हलता येत नाही; येणारा एक एक क्षण त्याच क्रमाने अनुभवावा लागतो; भूतकाळ हा त्याला केवळ स्मृतिरूपाने उपलब्ध असतो- काळात मागे जाता येत नाही; भविष्यकाळ तर संपूर्ण अज्ञात असतो. पुढेही जाता येत नाही. बुद्धीला जाणवतं की, विश्वाच्या अनंत विस्तारात अनेक आश्चर्ये आहेत, साहसे आहेत…पण ती आपल्यासाठी नाहीत…
का आहेत?
या संग्रहातल्या कथा कालकल्पनेशी निगडित आहेत. ‘अंधारयात्रा’ मध्ये मानव आपल्या अल्पायुष्याची कोंडी फोडून विश्वसंचारातले पहिले पाऊल टाकतो; ‘चक्रधर’ मध्ये अकल्पनीय कालप्रवास आणि कालाचे ऊर्जेत रूपांतराची धाडसी कल्पना आहे; बंदिवासमध्येही कालप्रवास आहे; पण अप्रगल्भ मनावरचा घातक परिणामही आहे…आणि ‘शेवटी एक पापणी लवली;- ; शास्त्रकथा अमेदीनीय आयुष्याखेरीज पुरी कशी होईल? त्या कथेतही काल आहे… पण कालाची सापेक्षता आणि स्वनिष्ठता यावर कथा आधारित आहे आणि काळाचे स्वरूपच असे आहे की, आपण रोजच्या जीवनाची गती सोडली की अनपेक्षित अनुभव येतात. या कथाही त्याला अपवाद नाहीत.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.