Ganam
Akravi Disha By Vasant Bapat
Akravi Disha By Vasant Bapat
आधुनिक मराठी कवितेचे विविध लयींतले सौंदर्य खऱ्याखुऱ्या अर्थाने वसंत बापट यांच्या कवितेत जाणवते. आधुनिकतेचा प्रदर्शनी बिल्ला बापटांच्या कवितेने कधीच मिरवला नाही. याचे कारण अभिजात नावीन्य तिच्या अंतरंगात भरून राहिले होते हेच आहे. बापटांच्या कवितेचा एक धागा परंपरेशी जुळलेला आहे; आणि त्याचबरोबर आपले वेगळे व्यक्तिमत्त्वही त्यांनी कलात्मक डोळसपणाने जपले आहे. यामुळेच, दुर्बोधतेचा धाक न बाळगता ते जसे अकराव्या दिशेचा ठाव घेतात त्याप्रमाणेच ओळखीच्या ठसक्यात मुंबईच्या मनकर्णिकेची लावणीही ते आळवतात. ‘लाटा लाटा चोरल वाटा परवल चुंबन एक’ असा उन्मादक सूर लावणारे बापट ‘माझ्या मनामध्ये आहे सिद्ध भगवी कफनी’ अशी वाटही चोखाळू शकतात. अनुभवांचा अनेकरंगी गोफ गुंफत असताना कलावंताची अलिप्तता बापट कधीच सोडित नाहीत: मानवी जीवनातले अनेकरंगी नाट्य त्यांच्या कवितेत उमटते ते यामुळेच. बापटांच्या नटरंगी शैलीचे रहस्यही त्यांच्या या वृत्तीतच आहे. ‘बिजली’ आणि ‘सेतू’ यानंतर प्रसिद्ध झालेल्या बापटांच्या या तिसऱ्या काव्यसंग्रहात त्यांच्या प्रतिभेच्या विकासाच्या सर्व खुणा उमटलेल्या दिसतील.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.