Ganam
Aghatit By Narayan Dharap
Aghatit By Narayan Dharap
Couldn't load pickup availability
जीवन खूप गुंतागुंतीचे आहे. कोणत्या क्षणी काय होईल, काही सांगता येत नाही. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशा काही अचंबित करणाऱ्या घटना घडत असतात. आपण काही तरी वेगळीच अपेक्षा करीत असतो. वेगळं काही तरी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असतात आणि अचानकपणे असं एखादं वळण येतं, की आपण मांडलेला सारा डाव एका क्षणात विस्कटून जातो. काय होत आहे ते आपल्याला कळण्याच्या, आपण समजून घेण्याच्या आधीच घडून गेलेलं असतं.
‘हे असं कसं घडलं?’
आपण आपल्यालाच आश्चर्यचकित होऊन विचारतो. एकूण घटनाक्रम आपलया तर्काच्या पलीकडे जाणारा असतो. कशाचा म्हणून काही अंदाज करता येत नाही. विचार करुल आपलं डोकं शिणून जातं; तरीही आपल्याला घडलेल्या घटनांचा काहीच मेळ लागत नाही.
कारण त्या घटना अकल्पित असतात, आपल्या कल्पनेपलीकडच्या असतात. आपली विचारशक्ती जिथे संपते तिथून त्या सुरू होतात.
आपण सारेच त्या काळाच्या, नियतीच्या हातातील बाहुले आहोत. कळसूत्री बाहुले आहेत, हे सत्य आपण एका पातळीवर स्वीकारतो; तरीही दुसऱ्या पातळीवर मात्र आपण विचार करीत असतो, शोध घेत असतो,
‘हे असं कसं घडलं?’
कारण ते सर्व अघटित असतं.
अशा अनेक थरारक आणि रोमहर्षक असलेल्या अकल्पित, अघटित घटनांच्या नारायण धारप यांच्या लेखनीतून उतरलेल्या कथा.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.