Ganam
Adimayche By Rahi Anil Barve
Adimayche By Rahi Anil Barve
Couldn't load pickup availability
तरंग आणि त्याच्या जीवनातल्या अनेक व्यक्तींची ही कहाणी. लौकिक जीवनात समाजाच्या उच्च स्तरात वावरणाऱ्या व्यक्तींच्या खाजगी आयुष्याची अंधारी बाजू राही बर्वे यांनी दृश्यमान केली आहे. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या संपन्न असणारी, अनेकदा पराकोटीची उच्च वैचारिक समज असणारी ही माणसे व्यक्तिगत आयुष्यात मात्र अनैतिक वागताना दिसतात. पण ती गुन्हेगार नाहीत, दुष्ट गिधाडे नाहीत, तर हीच त्यांची जीवनशैली आहे. त्या जीवनातदेखील त्यांची अशी काही तत्त्वे असतात, भावभावना असतात, सुखदुःखेही असतात. परंतु त्यांचे इतरांहून असलेले वेगळेपण हे की त्या सर्वांत ही माणसे फार अडकून पडत नाहीत. आपल्या अशा जगण्याविषयीची खंत क्वचित दिसली तरी त्याचा पश्चात्ताप अजिबात नसतो. एका वेगळ्याच नशेत. जगणारी ही माणसे, त्यांचे आयुष्य, असे आयुष्य वाट्याला येण्यामागची परिस्थिती आणि त्या परिस्थितीत जगणाऱ्या या माणसांच्या मानसिकता ‘आदिमायेचे…’ मध्ये राही बर्वे यांनी अचूक पकडली आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.