Diamond Publication
Adhunik Maharashtrateel Dharmachintan Visawe Shatak | आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतन - विसावे शतक By Dr Navnath Raskar, Dr. Sunil Raut | डॉ. नवनाथ रासकर, डॉ. सुनील राऊत
Adhunik Maharashtrateel Dharmachintan Visawe Shatak | आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतन - विसावे शतक By Dr Navnath Raskar, Dr. Sunil Raut | डॉ. नवनाथ रासकर, डॉ. सुनील राऊत
Couldn't load pickup availability
‘आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतन’ या त्रिखंडात्मक ग्रंथ उपक्रमातील हा पहिला ग्रंथ. यामध्ये लोकमान्य टिळक, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धर्मानंद कोसंबी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, वि. दा. सावरकर, गुरुदेव रा. द. रानडे, श्री गुलाबराव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आचार्य विनोबा भावे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गं. बा. सरदार, भा. ल. भोळे, दि. के. बेडेकर, प्रा. मे. पुं. रेगे, दि. य. देशपांडे इत्यादी धर्मचिंतक विचारवंतांचा आणि सुधारकांचा धर्मविषयक विचार किंवा चिंतन यांविषयी संबंधित अभ्यासकांनी व लेखकांनी संशोधक वृत्तीने लेखन केले आहे. एकंदर, विसाव्या शतकातील उपरोक्त धर्मचिंतकांची धर्मविषयक भूमिका या ग्रंथांमधून मांडली गेली आहे. विविध धर्मचिंतकांविषयीच्या या विवेचनाची एका ठिकाणी अभ्यासपूर्ण मांडणी होणे गरजेचे होते. अभ्यासकांच्या, संशोधकांच्या आणि सर्वच वाचकांच्या दृष्टीने हे एकत्रित संकलन हिताचे आहे. यामध्ये त्या त्या धर्माचिंतकांची धर्मविषयक भूमिका संबंधित लेखकांनी मांडली आहे. मराठी मनाची धर्मविषयक जाणीव प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ मार्गदीप ठरेल असे वाटते.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.