Ganam
Adgul Madgul By Dr. Shrikant Chorghade
Adgul Madgul By Dr. Shrikant Chorghade
अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीऽऽऽट लावू.’
नातवाशी असं लाडे लाडे बोलणारी आजी तुमच्या आठवणीत असेल कदाचित. त्या काळी घर मोठं आणि त्यात उतरंडीसारखी एका खालोखाल एक अशी मुलं असायची.
मुलांचं शिक्षण आणि संगोपन परस्पर पार पडायचं. मुलांवर संस्कार आपोआप घडायचे.
आज चित्र बदललेलं आहे. कित्येक घरी आपण दोघं व आपलं घरकुल असा आईबाबांचा सुटसुटीत आटोपशीर आजी-आजोबाविरहित संसार.
छकुल्याच्या संगोपनाची आणि जडणघडणीची सर्वस्वी जबाबदारी फक्त आईबाबांची!
काही घरी आईबाबा दोघंही जाणार नोकरीवर आणि बालक राहणार पाळणाघरात!
परवडच परवड! बालकाची व त्याच्या आईबाबांची!!
धार नाही, आधार नाही! काही पालकांना सतत अपराधीपणाची भावना!
भावना कमी करायला आधाराचा हात म्हणजे अडगुलं मडगुलं!
भ्रूणावस्था, जन्म, नवजात बालकांचं पोषण, त्यांचं शारीरिक स्वास्थ्य, त्यांचं बालसुलभ आचरण, त्यांच्या मनाचं व भावनांचं संगोपन, त्यांच्या तनाचा अन् मनाचा विकास, त्यांच्या संवेदना आणि आईबाबांकडून त्यांच्या अपेक्षा यांची 20 वर्षे वय होईपर्यंत अत्यंत सुसंगत नोंद म्हणजेच अडगुलं मडगुलं!
अडगुलं – मडगुलं म्हणजे बालसंगोपनाचं दैनिक पंचांगच!
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.