Ganam
ABHOGI by RANJEET DESAI
ABHOGI by RANJEET DESAI
घराणं आणि आविष्कार जन्मतो गायकाच्या गळ्यातून! महत्त्वाचा असतो, तो सूर! आवाज! आणि त्या कलावंतांची फेक! एकाच घराण्याच्या दहा गायकांची गाणी ऐकली, तर नव्या माणसाला ते घराणं कळेल का? काहीतरी गोंधळ होतो. काही समजत नाही. सुरानं बद्ध झालेली. तीन सप्तकांच्या पलीकडे जाता येत नाही. वाटतं! त्या पलीकडे जावं. नवे सूर, नवे अंदाज गाठावेत. नवे राग जन्माला यावेत. पाठीमागच्या लोकांनी घोटण्यासाठी नव्हे. त्यांनी तसंच काहीतरी निर्माण करावं, म्हणून! ते नवं शोधायला नवे पंख हवेत. सुरवंट आपला कोश बांधतं. आणि नंतर त्यातून फुलपाखरू जन्मतं. या फुलपाखराचा जन्म कलावंताला लाभत नसला, तर त्या कलावंताच्या जीवनाला अर्थ काय? सगळं सुख भोगायला असूनही ‘अभोगी’ राहिलेल्या कलावंताची रणजित देसार्इंनी रेखाटलेली भावपूर्ण कथा
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.