Ganam
Abhimanyu By Anuja Chandramouli Yogita Risbud
Abhimanyu By Anuja Chandramouli Yogita Risbud
कालातीत कथेचे कालोचित पुनर्कथन
अभिमन्यू, अर्जुनाचा जीव की प्राण आणि भारतातील ऐतिहासिक पौराणिक कथांमधले सगळ्यात प्रभावी आणि मनात रेंगाळणारे व्यक्तिमत्त्व! पाप-पुण्य, योग्य-अयोग्याचे वेगवेगळे निकष लावून अनेक कुकर्मे जिथे घडली ते कुरुक्षेत्र म्हणजे अभिमन्यूला सद्गती प्राप्त करून देणारी वीरभूमी! अभिमन्यू हा अद्वितीय आणि अतुलनीय पराक्रमाचे द्योतक होता. त्याची कथा सगळ्यांनाच माहीत आहे पण किती जण या उत्तमातील उत्तम अशा तरुणाला अंतरबाह्य जाणतात? 'अर्जुन' या प्रचंड लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका अनुजा 'चंद्रमौली अतिशय धडाडीने लोकांच्या कल्पनाशक्तीला जागवत या तेजस्वी राजकुमाराला शब्दातून साकार करतात. एक तेजस्वी धूमकेतू ज्याच्यात त्रिभुवनाला उजळवून टाकण्याची ताकद होती परंतु नशीबाने शापित असल्याने अल्पावधीतच तो अस्तंगत झाला! माहित असलेली कथा लेखिका अतिशय सृजनात्मक पद्धतीने खुलवतात आणि ताज्या दमाने सादर करतात. अतिशय सहृदय तीव्रतेने घेतलेला अभिमन्यूच्या व्यक्तिमत्वाचा वेध अशा अनेक गोष्टी उलगडून दाखवतो ज्या काळाच्या ओघात हरवल्याने या व्यक्तिमत्वाचे काही पैलू कधी प्रकाशात आलेच नव्हते. ही कथा वाचकाला खिळवून ठेवते आणि महाभारतातल्या या तेजस्वी
नायकाच्या दुर्दैवी अंताने मन पिळवटून टाकते.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.