Skip to product information
1 of 1

Ganam

Aatmahatya He Uttar Nahi By Dr. Sanjyot Deshpande

Aatmahatya He Uttar Nahi By Dr. Sanjyot Deshpande

Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर येणाऱ्या हतबलतेतून, हताशपणातून, 

नैराश्यातून, नकारात्मकतेतून बाहेर पडण्याचा आत्महत्या हा खरंच एकमेव 

मार्ग आहे? नाही... खरंतर आत्महत्या हे उत्तरच असू शकत नाही.


सातत्याने येणारं अपयश, भोवतालीची निराशाजनक परिस्थिती, त्यातून 

वाढत जाणारी असुरक्षिततेची भावना, यामुळे काही माणसं हतबल होतात. 

तीव्र स्वरूपाची नकारात्मकता मनाला ग्रासून टाकते आणि एका टप्प्यावर 

माणूस टोकाचा निर्णय घेऊन टाकतो, स्वत:ला संपवण्याचा...


परिस्थितीपुढे हताशपणे शरण जाणाऱ्या आणि आपल्या जीवाची किंमत 

देणाऱ्या प्रत्येकाने अशावेळी काही प्रश्न स्वत:ला विचारायलाच हवेत...


खरंच समोरची परिस्थिती निश्चितच खूप कठीण, कदाचित खूप आवाक्याबाहेरची 

असू शकते. पण याहीपेक्षा आपल्याला एकदाच मिळणारं आयुष्य, आपला जीव 

जास्त मोलाचा नाही का?


ही परिस्थिती कधीच बदलणार नाही, ही परिस्थिती कायमस्वरूपी अशीच राहणार 

आहे याच गोष्टीबाबत आपण इतके शाश्वत, ठाम का आहोत?


कोणत्याही गोष्टीची खात्री आपण देऊ शकत नाही, मग याच गोष्टीची आपण इतकी 

खात्री का बाळगत आहोत?


आपल्या जगण्यातल्या समस्या, गेलेली प्रतिष्ठा, तुटलेली नाती, गमावलेल्या गोष्टी, 

झालेलं दु:ख या सगळ्यांसाठी काही ना काही उत्तर सापडतं, कारण ते असतंच! 

कदाचित परिस्थिती मनासारखी बदलणार नाही पण तिला सामोरं जाण्यासाठी 

मनाने अधिक सक्षम होताच येतं.


यातनामय नाइलाज वाट्याला येणं हा कोणाच्याही गोष्टीचा शेवट असूच शकत नाही.

आयुष्याला नकार देऊ नका!


आपल्याला आयुष्याला होकारच द्यायचा आहे, Say yes to life ..

अशा हरलेल्या मन:स्थितीत स्वत:साठी आणि गरज असणाऱ्या आसपासच्या ए

खाद्याला मदत करण्यासाठी प्रत्येकाने जवळ बाळगावं असं हे पुस्तक!

सध्याच्या वातावरणात, प्रत्येक घरात, घरातल्या प्रत्येकाने वाचलंच पाहिजे !!

View full details