Ganam
A to Z Dairy Farming By Dr. Parag Ghogale, Prashant Kulkarni
A to Z Dairy Farming By Dr. Parag Ghogale, Prashant Kulkarni
Couldn't load pickup availability
दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथमत: गायी-म्हशी विकत घेतल्यानंतर त्यापासून चांगल्या जातिवंत गायी-म्हशी आपल्या गोठ्यात तयार करण्यासाठी मुख्यत: ‘प्रजनन’, ‘जनावरांचा आहार’, ‘समग्र व्यवस्थापन’ आणि ‘दुधाचे गुणवत्ता नियंत्रण’ या चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या समजून घेऊन पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करणे आवश्यक असते. थोडक्यात दूध व्यवसायाकडून दूध उद्योजकतेकडे जाण्याच्या प्रवासासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे.
जगभरात गायी-म्हशींच्या सुमारे ८०० प्रजाती आहेत. गायी-म्हशी २० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. गायीला एक नाही तर चार पोटे असतात. त्यांच्या पोटात कोट्यवधी सूक्ष्मजीव असतात. अशा अनेक रंजक गोष्टींचा उलगडा यांमधून होतो.
उपलब्ध तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन व आधुनिक व्यवस्थापन आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक दूध उत्पादक, शेतकरी, तरुणांना आणि अभ्यासकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.