1
/
of
1
Ganam
A PRISONER OF BIRTH by JEFFREY ARCHER
A PRISONER OF BIRTH by JEFFREY ARCHER
Regular price
Rs. 400.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 400.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
डॅनी कार्टराईटने बेथ विल्सनला लग्नाची मागणी आदल्या दिवशी किंवा दुस-या दिवशी घातली असती, तर त्याच्यावर आपल्या जिवलग मित्राचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला नसता आणि त्याला अटकसुद्धा झाली नसती. जेव्हा फिर्यादी पक्षाकडून चार नामांकित साक्षीदार आणण्यात येतात : एक बॅरिस्टर, एक लोकप्रिय अभिनेता, एक उच्चकुलीन प्रतिष्ठीत व्यक्ती आणि एक नावाजलेल्या फर्ममधला तरुण, धडाडीचा पार्टनर... तेव्हा तुमची बाजू कोर्टात कोण ऐकून घेणार? डॅनीला बावीस वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा होते. त्याला बेलमार्श तुरुंगात पाठवण्यात येतं. देशातल्या सर्वांत जास्त कडक सुरक्षाव्यवस्थेसाठी प्रसिद्ध असलेला हा तुरुंग! आजवर कोणताही कैदी तिथून पळून जाऊ शकलेला नाही. पण डॅनीच्या अंतर्यामी एक आग भडकलेली आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची आग. ती आग त्याला जाळते आहे; पण याची किंचितही कल्पना स्पेन्सर क्रेग, लॉरेन्स डेवनपोर्ट, जेराल्ड पेन आणि टोबी र्मोिटमर यांना नाही. डॅनीला साथ आहे त्याच्या प्रेयसीची, बेथची. डॅनीच्या नावाला लागलेला कलंक धुवून काढण्यासाठी तिनेही न्यायालयाची दारं ठोठावलेली आहेत. सच्चा दिलाच्या या प्रेमिकांच्या अथक प्रयत्नांनी अखेर त्या चौघांना पळता भुई थोडी होते. जिवावर उदार होऊन अखेर रणांगणातून पळ काढावा लागतो. `केन आणि एबल` नंतरची तेवढीच जबरदस्त, वाचकांची मती गुंग करणारी, शेवटच्या पानापर्यंत वाचकांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांना खिळवून टाकणारी ही कादंबरी!
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.