1
/
of
1
Ganam
1971 Chauda Diwasancha Chamatakar By Vilas Fhadake
1971 Chauda Diwasancha Chamatakar By Vilas Fhadake
Regular price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 198.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ह्या युद्धापूर्वी भारतावर १९६५ साली चीनच्या मदतीने पाकिस्तानने आक्रमण करून युद्ध पुकारले होते, आणि त्यातही भारत देशाने विजय प्राप्त केला होता. ती पाकिस्तानी जनमानसावर झालेली युध्दाची जखम ओली असतानाही '३ डिसेंबर १९७१ च्या सायंकाळी पाकिस्तानने एकदम काश्मीर ते राजस्थान ह्या उत्तर- पश्चिम भारतीयसीमेवर हल्ले करण्यास सुरुवात केली, ती पूर्व पाकिस्तान डोळ्यासमोर ठेऊन, तिथली लोकशाही त्यांना चिरडून टाकायची होती, ह्या सीमेजवळच्या पंजाब प्रांतातल्या महत्त्वाच्या शहरांसहित एकंदर अंदाजे वीस शहरांवर बॉम्ब हल्ले झाले होते. पूर्व पाकिस्तानचा तो प्रदेश मूळ पश्चिम बंगालच्या मध्य भागात नोंद झाला होता, त्यामुळे तिथला नकाशाच बदलून गेला होता, त्यावर पश्चिम पाकिस्तानला आपला हक्क सांगून तिथे त्यांना आपलीच सत्ता पक्की करायचा त्यांचा एकंदर विचार होता... पण, तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या संपूर्ण पाठिंब्यामुळे मेजर जनरल, आणि पुढे फिल्ड मार्शल चा हुद्दा प्राप्त झालेले माणेकशॉ ह्यांच्या सेना नेतृत्वाखाली भारतीय सेनेने पाकिस्तानच्या पश्चिम आणि पूर्व अश्या दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानी सेनेला खडे चारले आणि पूर्व पाकिस्तानचा वेगळा असा ' बांगला देश' एकंदर चौदा दिवसांच्या युध्दात जन्माला आला. त्यामागे भारत देश पूर्ण ताकदीने उभा होता....ह्या एकंदर चमत्कृतीजन्य अश्या घटनेची ही 'युद्धस्य रम्यकथा' आहे, ती संपूर्ण वाचण्यात खरी रम्यता आहे ती लेखक श्री. विलास फडके यांच्या शब्दातच....
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.