{"product_id":"wari-ek-anandyatra-वारी-एक-आनंदयात्रा-by-sandesh-bhandare-संदेश-भंडारे","title":"Wari Ek Anandyatra वारी एक आनंदयात्रा By Sandesh Bhandare संदेश भंडारे","description":"\u003cp\u003eपुंडलिकाने जशी आपल्या आई-वडिलांना बरोबर घेऊन वारी केली व त्यांना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचंद्रभागेत स्नान घातले, वारकरी आज आपल्या आई-वडिलांची तशीच सेवा करताना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदिसतात. 2001 साली आषाढी एकादशीला मी गेलो असताना हे दृश्य मला दिसले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवारीपरंपरेमध्ये असणारी सेवाभावी वृत्ती या छायाचित्रात पकडता आली याचा मला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआनंद वाटला. छायाचित्रात दिसणारा वृद्ध वारकरी पाणी अंगावर पडताना शांत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्ताने डोळे मिटून समाधान अनुभवत होता. पायी वारी केल्यानंतरच्या या स्नानाने\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या चेहर्यावर समाधान दिसत होते. आठशे वर्षाच्या या वारीपरंपरेचा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछायाचित्रात्मक शोध घेण्याची प्रेरणा या छायाचित्राने मला मिळाली. ‘वारी एक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआनंदयात्रा’ हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर माझी छायाचित्रात दिसणार्या शंकर भैरू\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगाडे या गडहिंग्लज तालुक्यातील वारकर्याशी भेट झाली. त्यांना स्नान घालणारी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eती माणसे त्यांच्या कुटुंबातील नव्हती. एवढेच नाही, तर ते त्यांच्या ओळखीचेदेखील\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनव्हते, ना ते एका दिंडीतील होते, हे त्यांच्याकडून मला समजले. वडिलधारी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यक्ती एकटीच स्नान करताना पाहून ती व्यक्ती आपल्याच कुटुंबातील असे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमजून इतर वारकर्यांनी त्यांना स्नान घातले. रक्ताचे नाते नसतानाही\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवडिलधार्या व्यक्तीला आपले वडील समजून स्नान घालताना टिपलेला हा प्रसंग\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यामुळे एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला.\u003c\/p\u003e","brand":"manovikas prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51913271247068,"sku":null,"price":430.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/51tGUG-BvqL.jpg?v=1783015482","url":"https:\/\/ganam.in\/products\/wari-ek-anandyatra-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-by-sandesh-bhandare-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%ad%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}