{"product_id":"vivaswan-suryadev-विवस्वान-सूर्यदेव-by-pratik-kokil-प्रतिक-कोकिळ","title":"Vivaswan Suryadev | विवस्वान सूर्यदेव By Pratik kokil |  प्रतिक कोकिळ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअंधाराचा अंत करण्यासाठी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाध्या शस्त्रांची नव्हे,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतर ‘ब्रह्मतेजाची’ गरज असते...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजेव्हा स्वर्गाची सुवर्ण कवाडे असुरांच्या पायाखाली तुटली, जेव्हा देव स्वतःच्या अस्तित्वासाठी मृत्यूलोकी भटकू लागले आणि जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड अधर्माच्या काळोखात बुडाले, तेव्हा एका मातेच्या अगतिक अश्रूंमधून एक महाप्रकाशाचा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंकल्प जन्मला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहा प्रवास आहे ‘मार्तंडाचा’जो एका मृतवत भासणाऱ्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअंड्यातून अथांग जलाच्या काळोखाशी झुंजत बाहेर आला. हा प्रवास आहे ‘विवस्वानचा’ज्याने आकाशात झेप घेऊन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसुरांच्या मायेला जाळून भस्म केले आणि हा प्रवास आहे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका पित्याचाज्याने स्वतःच्या कुटुंबाच्या आनंदासाठी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वतःच्या तेजाचा त्याग केला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपण ज्या सूर्याच्या प्रकाशात रोज आपलं जग शोधतो,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्या सूर्याच्या संघर्षांची ही गाथा आपल्याला कधीच का सांगितली गेली नाही? ज्याच्यामुळे आपण श्वास घेतो, तो ‘ग्रहाधिपती’ स्वतःच्या घरात सुरू असलेल्या संज्ञा आणि छायेच्या युद्धात कसा होरपळला? न्यायाची देवता शनिदेव आणि मृत्यूचा अधिपती यमराज यांचा उगम नक्की कसा झाला?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे केवळ एक काल्पनिक पुस्तक नाही, तर तो आपल्यातील\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘तेजाचा’ शोध आहे. ‘मार्तंड ते सूर्यदेव’ ही एका पराक्रमी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदेवतेची थक्क करणारी महागाथा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआयुष्यात कितीही मोठा अंधार असला,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतरी उद्याचा उदय अटळ असतो...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहाच विश्वास देणारा एक अजोड प्रवास!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविवस्वान-सूर्यदेव... एका महाप्रवासाची गाथा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"bookganga","offers":[{"title":"Default Title","offer_id":52157308502236,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/wmremove-transformed_7.jpg?v=1785735611","url":"https:\/\/ganam.in\/products\/vivaswan-suryadev-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-by-pratik-kokil-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b3","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}