{"product_id":"turki-manjarakadun-aaleli-patre-by-makrand-sathe","title":"Turki Manjarakadun Aaleli Patre  By Makrand Sathe","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतुर्की मांजराकडून आलेली पत्रे’ ही कादंबरी दहा मांजरींची शोधकथा आहे. आपल्या मालकांना दुःखी करणारे, त्यांना वेदना देणारे एक गुपित आहे, असे त्यांना वाटते. त्या गुपिताचा शोध घेताना त्या एकमेकींना पत्रांद्वारे संदेश पाठवतात. या मांजरींचे मालक १९८० साली तुर्कस्तानात झालेल्या लष्करी उठावानंतर देश सोडून युरोपातील विविध देशांत आश्रय घ्यायला भाग पडलेले लोक आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e१९८९-९० या काळात बर्लिन भिंत आणि समाजवादी व्यवस्था कोसळल्याने त्यांच्या आशा, ओळख आणि श्रद्धाही कोसळतात. मायदेशापासून दूर, परक्या भूमीवर हा सारा प्रवास अनुभवावा लागणे त्यांचे आयुष्य अधिकच कठीण करून टाकते. एका बाजूला त्यांच्या शोकांतिका, दुःख, जीवनाविषयी आणि स्वतःविषयीचे प्रश्न हे सगळे मांजरींच्या तोंडून, त्यांच्या सहजप्रज्ञेच्या माध्यमातून कथन केले जाते. दुसऱ्या बाजूला मांजरींचे स्वतंत्र जीवन, त्यांच्यातील नातेसंबंध, प्रेमप्रकरणे, ‘Curiosity killed the cat’ या म्हणीत प्रतिबिंबित होणारी त्यांची कुतूहलवृत्ती, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या ‘मालकांची गुपिते शोधा’ या संघटनेची कारस्थाने यांचे मजेशीर चित्रण या कादंबरीत केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘तुर्की मांजराकडून आलेली पत्रे’ मध्ये ‘मांजर असणे’ आणि ‘माणूस असणे’ या अवस्थांचे गुंतागुंतीचे कथन आहे. त्या कथनाचा तत्त्वज्ञानात्मक परिणाम आहे आणि जगाच्या अत्यंत अस्थिर काळाचे राजकीय-मानसशास्त्रीय विश्लेषणही आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकादंबरीतील एक मांजर-नायिका नीना-लेखकाची स्वतःची मांजर-अत्यंत निर्भीडपणे या पुस्तकाचे मूल्यमापन करताना म्हणते :\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘या पुस्तकात मांजरींबद्दल काही विशेष नवीन सांगितलेले नाही; पण माणसांना जवळून ओळखण्याची आणि समजून घ्यायची इच्छा असलेल्या मांजरींसाठी हे एक अत्यंत उपयुक्त साधन आहे. ‘तुर्की मांजराकडून आलेली पत्रे’ वाचल्यानंतर कोणताही माणूस मांजरींकडे पूर्वीप्रमाणे पाहू शकणार नाही; आणि कोणतीही मांजर माणसांकडे पूर्वीप्रमाणे पाहू शकणार नाही.’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":50238787092700,"sku":null,"price":390.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Turki-Manjarakadun-Aleli-Patrea_front-cover-MRP-450.webp?v=1778093231","url":"https:\/\/ganam.in\/products\/turki-manjarakadun-aaleli-patre-by-makrand-sathe","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}