{"product_id":"the-radical-in-ambedkar-द-रॅडिकल-इन-आंबेडकर-by-suraj-yengde-anand-teltumbde-सुरज-एंगडे-आनंद-तेलबुंडे","title":"The Radical In Ambedkar द रॅडिकल इन आंबेडकर  By Suraj Yengde  Anand Teltumbde सुरज एंगडे  आनंद तेलबुंडे","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसूरज एंगडे आणि आनंद तेलतुंबडे यांनी संपादित केलेला हा संग्रह \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eम्हणजे एक लँडमार्क असून, आधुनिक भारतातील स्वातंत्र्य आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसमतेचे खंदे पुरस्कर्ते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआहे, तिला बळकटी आणणारा आहे. भारतातील लोक आंबेडकरांचा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसामाजिक परिवर्तनाचा दूत, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eम्हणून गौरव करतात. परंतु याहीपलीकडे जात, प्रस्तुतचा लक्षणीय \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eग्रंथ हा आंबेडकरांच्या वारशातील मूलगामित्व उलगडवून दाखवणारा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअसून, यासाठी त्यांच्या जीवनातील अद्यापि दुर्लक्षित राहिलेल्या पैलूंची \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eयेथे चिकित्सा करण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमुख्यत्वे ‘दलित अस्मितेचा आदर्श’ म्हणून लाखो लोकांसाठी आंबेडकर \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eवंदनीय असले तरी, त्याचबरोबरीने ते भारतीय इतिहासाचे, समाजव्यवस्थेचे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआणि परराष्ट्रधोरणाचे एक गंभीर अभ्यासक होते, हे विसरून चालणार नाही. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eतसेच ते प्रारंभीच्या काळातील मानवी अधिकारांचा पुरस्कार करणारे पहिले-\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eवहिले वकील होते, एक पत्रकार होते आणि एक राजनीतिज्ञ देखील होते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eद रॅडिकल इन आंबेडकर हा ग्रंथ म्हणजे प्रचंड मोठी व्याप्ती असणारा आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रकांड विद्वत्तेने भारलेला एक विलक्षण लेखसंग्रह असून त्याचा आवाका हा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआंबेडकरांच्या प्रचलित प्रतिमेच्या पल्याड जाणारा आहे. नव्या जगाचे स्वप्न \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा ग्रंथ आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"manovikas prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50305751908572,"sku":null,"price":750.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Ambedkar-800x800.jpg?v=1779210374","url":"https:\/\/ganam.in\/products\/the-radical-in-ambedkar-%e0%a4%a6-%e0%a4%b0%e0%a5%85%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b2-%e0%a4%87%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0-by-suraj-yengde-anand-teltumbde-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%9c-%e0%a4%8f%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}