{"product_id":"sujeet-karlekarcha-swapanabhang-by-dr-lily-joshi","title":"Sujeet Karlekarcha Swapanabhang By Dr Lily Joshi","description":"\u003cp\u003eपन्नास वर्ष वैद्यक व्यवसायात असल्याने लेखिका डॉ. लिली जोशी यांना असंख्य पेशंट्स, त्यांचे नातेवाईक, नात्यांमधील गुंतागुंत, मानसिक आंदोलनं आणि आर्थिक ताण हे सर्व अगदी जवळून पाहता आलं. रोजचे तेच ते पेशंट आणि तेच ते आजार असा सरधोपट दृष्टिकोन न ठेवता संवेदनशील मनाची ही लेखिका त्यांच्या अंतर्मनात शिरून, कल्पित शब्दांच्या दुनियेतून त्यांना बघू लागली. डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असताना आलेले दाहक, भेदक आणि अंतःस्पर्शी अनुभव यांतून मग भावपूर्ण कथा त्यांच्या मनात आकार घेऊ लागल्या… थांग न लागणारी अनेकविध पात्रं, नाट्यमय प्रसंग आणि समाजाची वास्तवचित्रणं करतानाही त्यातून निघू शकणारा सकारात्मक दृष्टिकोन या कथांमध्ये डोकावू लागला… आणि मग अनुभव व कल्पकता यांची गुंफण होऊन साकार झाल्या या चौदा कथा ! या कथांमधून डॉ. लिली जोशी यांच्या प्रगल्भ लेखणीचा जागोजागी प्रत्यय येत राहतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवी स्वभावाची आणि समाजाची विविध रूपं टिपणाऱ्या कथांचा संग्रह… सुजीत कार्लेकरचा स्वप्नभंग\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":50259500105948,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/SujitKarlekarSwapanabhyanga_cover.jpg?v=1778603699","url":"https:\/\/ganam.in\/products\/sujeet-karlekarcha-swapanabhang-by-dr-lily-joshi","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}