rohan prakashan
Smile@60 स्माइल@60 By Rohini Patwardhan रोहिणी पटवर्धन
Smile@60 स्माइल@60 By Rohini Patwardhan रोहिणी पटवर्धन
Couldn't load pickup availability
आपण आजूबाजूला अगदी सहज जरी नजर टाकली तरी लक्षात येते ती वृद्धांची वाढती संख्या ! झपाट्याने वाढणाऱ्या वृद्धांच्या संख्येमुळे निर्माण झालेल्या समस्यांचं स्वरूप बहुआयामी झालं आहे. घरकाम करणारे सेवक ते तज्ज्ञ व्यक्तीं ते शासनकर्ते… सर्वांचाच वृद्धांशी संबंध येत असतो, पण यापैकी कोणत्याही घटकांकडे वृद्धांचं आयुष्य आनंददायी आणि कृतार्थ व्हावं यासाठी नेमकं काय करावं लागतं, याविषयी आवश्यक माहिती उपलब्ध नसते.
वृद्धकल्याणशास्त्र (Gerontology) नावाचं एक क्षेत्र असतं हे तर आपल्या देशात कोणाच्या खिजगणतीतही नसेल! ते जाणून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशा साहित्याची आज फार मोठी गरज आहे. ‘स्माइल @ 60’ हे पुस्तक ती उणीव भरून काढतं. या पुस्तकात वृद्धकल्याणतज्ज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी अभ्यासपूर्ण माहिती देऊन अनुभवसिद्ध मार्गदर्शन केलं आहे. त्याचबरोबर वृद्ध कल्याणासाठी ‘समाज भांडवल’, ‘संवाद सूत्र’, ‘मैत्रीची शपथ’ आणि ‘अनुबंध मंडळ’ यांसारख्या अभिनव आणि सहज शक्य होणाऱ्या उपाययोजना सुलविल्या आहेत. या उपाययोजनांमुळे वृद्धांना, त्यांच्या कुटुंबाला आणि पर्यायाने समाजालाही एक दिशा मिळेल, वृद्धांना सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा निश्चित असा मार्ग सापडेल असा विश्वास आहे.
वृद्धकल्याणाचा विविध अंगाने विचार करत एक सकारात्मक दृष्टिकोन देणारं पुस्तकः स्माइल @ 60
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.