{"product_id":"sitayanसीतायण-by-chitra-banerjee-divakaruni-चित्रा-बॅनर्जी-दिवाकरुणी","title":"Sitayanसीतायण By Chitra Banerjee Divakaruni चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी","description":"\u003cp\u003e‘ज्या वेळी मी अंधारात एकटीच दुःखातिशयानं वृक्षाखाली उभी होते त्या वेळी मला काय वाटलं होतं ते तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला माझ्या मनात दाटून आलेली हताशा, निराशा ज्ञात नाही. तुम्हाला माझा अत्यानंदसुद्धा माहीत नाही. पहिल्यांदा वनात आल्यानंतर मला काय वाटलं होतं, माझ्या मनात किती आनंदोल्हास भरून राहिला होता आणि नंतर अयोध्येत परतल्यानंतरही मला किती अत्यानंद झाला होता ते तुम्ही जाणत नाही, ऋषीवर ! त्या काळात मी या सृष्टीतील सर्वाधिक प्रेम केली जाणारी व्यक्ती होते.’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरामायण हे जगातील महान महाकाव्यांपैकी एक आहे. ती एक शोकान्त प्रेमकथाही आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेतून या कथेचं पुनर्कथन करताना चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी सीतेला या महाकाव्याच्या केंद्रस्थानी ठेवतात. हे सीतेनं तिच्या दृष्टिकोनातून मांडलेलं रामायण- खरं म्हणजे सीतायण आहे. ‘सीतायण ‘मध्ये रामायण या महाकाव्यातील इतर काही स्त्रियांकडेही माणूस म्हणून पाहून त्यांच्याविषयी लिहिण्यात आलं आहे. गैरसमजातून नेहमीच उपेक्षित ठेवण्यात आलेल्या कैकेयी, शूर्पणखा, मंदोदरी यांच्यासारख्या स्त्रियांचा त्यांच्यामध्ये समावेश आहे. कर्तव्य, विश्वासघात, अधर्म, पावित्र्य आणि सन्मान यांविषयीच्या प्रभावशाली टिप्पणीसह पुरुषप्रधान जगात आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या स्त्रीची ही गाथा आहे. चित्रा यांनी प्राचीन कथेला मनाचा ठाव घेणाऱ्या, समकालीन इच्छा-आकांक्षांच्या संघर्षात रूपांतरित केलं आहे. रामायणाचं आजही सातत्यानं वाचन-श्रवण केलं जात असलं तरी आपल्या या कादंबरीत काही प्रश्न उपस्थित करून त्यांनी या कथेला आजच्या काळाशी अधिक सुसंगत केलं आहे. स्त्रियांना प्रिय असलेल्या पुरुषांनी त्यांच्याशी कसं वागावं? कोणत्याही नात्यात आणि प्रेमसंबंधांमध्ये स्त्रियांचे काय अधिकार असतात ? स्त्रीनं कधी प्रतिकार करण्यासाठी खंबीरपणे उभं राहून ‘यापुढे आणखी सहन करणार नाही,’ असं ठामपणे सांगितलं पाहिजे ? अशा प्रश्नांवर मनन करण्यास त्या वाचकांना प्रवृत्त करतात\u003c\/p\u003e","brand":"madhushree publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":50301928767708,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/book-cover-for-website-15.jpg?v=1779112490","url":"https:\/\/ganam.in\/products\/sitayan%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a3-by-chitra-banerjee-divakaruni-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}