dilipraj prakashan'
Shadow House शॅडो हाउस By Sourabh Wagale सौरभ वागळे
Shadow House शॅडो हाउस By Sourabh Wagale सौरभ वागळे
Couldn't load pickup availability
शॅडो हाऊस... मेळघाटाच्या घनदाट अरण्याच्या मधोमध उभा असलेला एक प्राचीन, आलिशान बंगला. हा बंगला एका धनाढ्य उद्योगपती जगदीश पारेखच्या नजरेत येतो आणि तो त्या बंगल्यावर वर्षाअखेरीची पार्टी आयोजित करण्याचे ठरवतो. या पार्टीला जगदीशची बायको आणि हाऊसमेड यांखेरीज आणखी चार आमंत्रित येऊन पोचतात. सगळेजण चीअर्स करण्यासाठी ग्लास उचलतात... आणि नेमकं तेव्हाच अकल्पित घटना घडण्यास सुरुवात होते - बंगल्याच्या दारात स्वतःला वाइल्डलाइफ फोटोग्राफर म्हणवून घेणारा एक गूढ पाहुणा येणं; काहीच वेळात बंगल्यातील दिवे एकाएकी जाणं आणि पार्टीत एक अकल्पित खून होणं....! खुनी बंगल्यात शिरलेला अनाहूत पाहुणा आहे का? की तो जमलेल्या आमंत्रितांपैकीच एक आहे? त्याच्या कचाट्यातून कोण वाचणार आणि त्याचा बुरखा कोण खाली खेचणार? नक्की वाचा, अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारी क्लासिक मर्डर मिस्ट्री - शॅडो हाऊस !
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.