saket prakashan
Ratan Tata रतन टाटा By Jaiprakash Zende जयप्रकाश झेंडे
Ratan Tata रतन टाटा By Jaiprakash Zende जयप्रकाश झेंडे
Couldn't load pickup availability
टाटा समूहाला जागतिक क्षितीजावर सन्माननीय स्थान मिळवून देणारे रतन टाटा!
'वचन म्हणजे वचन' या उक्तीला शब्दशः जागणारे, 'टाटा' नावाच्या वारश्याला जीवापाड जपणारे 'रतन टाटा'. भारतीय उद्योगविश्वातील एक अस्सल आणि अनमोल रत्नच! टाटा समूहाच्या जागतिक पातळीवरील यशात रतन टाटा यांची भूमिका मोलाची आहे. टाटा उद्योगसमूहाचे एकीकरण, एकत्रीकरण आणि विस्तार त्यांनी अत्यंत कौशल्याने केला. हे करताना त्यांनी टाटांच्या नीतीमूल्यांशी कुठलीही तडजोड केली नाही.
रतन टाटांना इतिहास केवळ त्यांच्या आदर्श, दूरदर्शी आणि कणखर नेतृत्वासाठीच लक्षात ठेवणार नाही; तर त्यांच्या परोपकारी, न्याय्य आणि मानवतावादी दृष्टिकोनासाठी देखील सदैव स्मरणात ठेवेल.
भारतीय ऋषी म्हणजे ज्ञान, अनुभव, कृतिशीलता आणि कौशल्ये यांचा एकत्रित संगम । रतन नवल टाटा हे असेच एक तेजस्वी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते, याची प्रचिती आपल्याला प्रस्तुत पुस्तक वाचल्यावर येईल.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.