saket prakashan
Ranzunjar रणझुंजार By Pratap Gangavane प्रताप गंगावणे
Ranzunjar रणझुंजार By Pratap Gangavane प्रताप गंगावणे
Couldn't load pickup availability
या पुस्तकाच्या पानोपानी तुम्हाला रांगड्या सह्याद्रीचा साक्षात्कार होईल.
प्रत्येक ओळीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या तेजाळ खुणा दिसतील.
मजकुरातून देखण्या नागाची सळसळ जाणवेल,
बहिरी ससाण्याच्या भेदक नजरेतून अफाट शौर्याचा अनुभव येईल,
शब्दाशब्दांतून स्वराज्यप्रेमाचा रसरशीत स्फुलिंग दिसेल ...
काळ्या कातळावरचा अज्ञात रक्ताचा सपकारा मनाला अस्वस्थ करेल,
भाबड्या मावळ्यांच्या निस्सीम शिवप्रेमाने अंत:करणाला पाझर फुटेल.
ही आहे झुंजार मावळ्यांच्या पराक्रमाची, जिद्दीची, अखंड जयमाला.
हे त्या तलवारींचे स्मरण आहे. ज्यांच्या धारेने बलाढ्य बादशाही गर्वाचा चुराडा केला,
ही त्या शेता-बांधावरच्या असंख्य मावळ्यांच्या बलिदानाची अमरकहाणी आहे.
ज्यांनी आपल्या निष्ठावंत रक्ताने स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास रचला,
त्या सार्वभौम स्वराज्याच्या रोमहर्षक, प्रेरणादायी, शौर्यकथांची ही यशोगाथा ...
रणझुंजार !
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.