madhushree publication
Rakhmabai रखमाबाई By Sudhir handra सुधीर चंद्र
Rakhmabai रखमाबाई By Sudhir handra सुधीर चंद्र
Couldn't load pickup availability
औपचारिक शिक्षण नाकारण्यात आलेल्या रखमाबाईंचा अवघ्या अकराव्या वर्षी एकोणीस वर्षांच्या व उधळ्या वृत्तीच्या दादाजी भिकाजीशी विवाह झाला. त्यांनी अशा निरुद्योगी पतीसोबत राहण्यास नकार दिला. परिणामी, रखमाबाईंवर ‘वैवाहिक हक्क पुनः स्थापने’चा खटला लादून त्यांना न्यायालयात खेचण्यात आलं. ह्या खटल्यामुळे झालेल्या सामाजिक व राजकीय चर्चेचे दूरगामी परिणाम झाले. रखमाबाईंच्या ह्या ऐतिहासिक बंडखोरीस ब्रिटिश व भारतीय प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिल्यामुळे जागतिक स्त्रीवादाची खंदी पुरस्कर्ती अशी त्यांची प्रतिमा जनमानसात रुजली, आणि महनीय समाजसुधारकांच्या भरघोस पाठिंब्यामुळे रखमाबाईंचा इंग्लंडमधील वैद्यकीय शिक्षण घेण्याचा मार्ग खुला झाला. ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वूमेन’ या संस्थेत त्यांनी शिक्षण घेतलं. १८९४मध्ये डॉक्टर होऊन त्या भारतात परतल्या. त्यानंतर प्रसिद्धीपासून दूर राहत, सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला, आणि १९२९मध्ये निवृत्त होईपर्यंत सुरत व राजकोटच्या प्रमुख इस्पितळांमध्ये त्यांनी निष्ठेने काम केलं. ह्यादरम्यान उद्भवलेल्या दोन महामारींच्या काळात रखमाबाईंनी अनेकांचे प्राण वाचवले. आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत त्यांनी बऱ्याच अवघड शस्त्रक्रिया केल्या आणि त्याचबरोबर स्त्रियांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत ह्यासाठी बाईंनी सर्व स्तरांमधील स्त्रियांना जागृत व प्रेरित केलं. स्त्रीमुक्तीच्या इतिहासात रखमाबाईंचं नाव अजरामर झालं असलं, तरी त्यांना या प्रवासात अनेक अडथळ्यांशी सामना करावा लागला. मात्र अतिशय संयतपणे व दुर्दम्य निर्धाराने त्यांनी त्यांवर मात केली. ह्या विलक्षण प्रवासाची ही असामान्य जीवनकहाणी !
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.