{"product_id":"prawasaya-by-narayan-tak","title":"Prawasaya | प्रवासायन By Narayan Tak | नारायण टाक","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रवासायण : निसर्ग, कला आणि संस्कृतीची अनुभूती\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारतवर्षाच्या अथांग निसर्गाचा, प्राचीन कलेचा आणि समृद्ध संस्कृतीचा जिवंत अनुभव देणारा हा अनोखा प्रवासग्रंथ आहे. लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि त्यांनी स्वतः साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रेखाचित्रांमधून वेगळीच कलात्मक प्रवासगाथा साकारली आहे. पुस्तकातील लेखन चित्रदर्शी आहे; वाचताना आपण स्वतः लेखकासोबत प्रवास करत आहोत, असा प्रत्यक्ष अनुभव येतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया प्रवासाची सुरुवात काश्मीरच्या दल सरोवरापासून होते. रोहतांगच्या रुपेरी बर्फाच्छादित गिरिशिखरांपासून मनाली-खज्जियारमार्गे हा प्रवास पुढे जातो. दक्षिण भारतात जाताना बांदीपूरच्या जंगलातील थरार अनुभवता येतो. मुनार-अलप्पुझाच्या देखण्या निसर्गसौंदर्याचे दर्शन घडते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुढे बदामी, ऐहोळे, पट्टडकल, लेपाक्षी व श्रीरंग येथील अद्भुत पाषाणशिल्पे आणि भव्य स्थापत्यकलेच्या ऐतिहासिक वैभवाकडे हा प्रवास घेऊन जातो. पश्चिमेकडील सिंधू संस्कृतीचे वैभव असलेल्या लोथलच्या प्राचीन बंदरापर्यंत, प्राचीन काळातील पहिले प्रजासत्ताक असलेल्या वैशाली नगरीपर्यंत आणि त्यानंतर ईशान्येतील काझीरंगाच्या जंगलातील प्राण्यांचे, एकशिंगी गेंड्यांचे अरण्यानुभव घेता येतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारताच्या विविधतेने नटलेला हा संपूर्ण प्रवास वाचकांना थक्क करून सोडतो. निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी, कलाप्रेमी आणि पर्यटक यांना एकाच वेळी आनंद देणारा हा अप्रतिम ग्रंथ आहे. प्रवासातील अनुभव प्रत्येक वाचकाला समृद्ध करतील आणि भारताच्या गौरवशाली वारशाची एक नवी दृष्टी देतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"vishwakaram Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67870020075740,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/71AmQiThumL._SL1004.jpg?v=1792689649","url":"https:\/\/ganam.in\/products\/prawasaya-by-narayan-tak","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}