{"product_id":"panchtantratil-nitishastra-पंचतंत्रातील-नीतिशास्त्र-by-ca-milind-shridhar-bhaveसीए-मिलिंद-श्रीधर-भावे","title":"Panchtantratil Nitishastra पंचतंत्रातील नीतिशास्त्र  By CA. Milind Shridhar Bhaveसीए मिलिंद श्रीधर भावे","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपंचतंत्र या केवळ मुलांच्या गोष्टी नाहीत, तर त्यात नीती आणि धोरणं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eया विषयांच्या तत्त्वांचा उहापोह केला आहे. ही तत्त्वे आपल्या व्यक्तिगत \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजीवनात तसेच सार्वजनिक जीवनातही उपयोगी ठरणारी आहेत. मुख्य \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eम्हणजे या तत्त्वांच्या आधारे आपण सभोवतालचं समाजकारण, अर्थकारण, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eराजकारण, सांस्कृतिक बदल चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. योग्य \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनिर्णय घेण्यासाठीही या तत्त्वांचा वापर आपल्याला करता येतो. आणि हे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसारं काही संस्कृत श्लोकांचा आधार घेत पक्षी-प्राण्यांचा रुपकात्मक \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eवापर करून गोष्टीरुपाने सांगितलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआपलं आयुष्य एक प्रवास असतो असं समजलं, तर या प्रवासात प्रत्येकजण \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआपल्या क्षमतेनुसार सफल आणि सार्थक आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करत \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअसतो. या प्रयत्नात मार्गदर्शन करणारं ज्ञान म्हणजेच नीती हा अत्यंत उपयुक्त \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअसा घटक, जो नीतिशास्त्र म्हणून ओळखला जातो. नीतिशास्त्राचं ज्ञान हे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकोणत्याही टप्प्यावर आपल्याला उपयुक्त ठरतं. तेच नीतिशास्त्र पंडित \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eविष्णुशर्मा यांनी पंचतंत्रातल्या गोष्टीतून आपल्यासमोर मांडलं. या गोष्टींचा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबारकाईने अभ्यास केला तर आयुष्य सफल आणि सार्थक बनवण्यासाठी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकाय मार्गदर्शन पंचतंत्र करतं याचा वेध घेता येतो. त्याचाच एक प्रयत्न \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eम्हणजे हे पुस्तक होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"manovikas prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51137392410844,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/PanchtantratilNitishastra-800x800.jpg?v=1781288378","url":"https:\/\/ganam.in\/products\/panchtantratil-nitishastra-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-by-ca-milind-shridhar-bhave%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%8f-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a7%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}