{"product_id":"offbeat-cruise-safar-set-ऑफबीट-क्रूझ-सफर-सेट-by-jayprakash-pradhan-जयप्रकाश-प्रधान","title":"Offbeat Cruise Safar Set  ऑफबीट क्रूझ सफर सेट By Jayprakash Pradhan | जयप्रकाश प्रधान","description":"\u003ch2 class=\"product_title entry-title\"\u003eऑफबीट क्रूझ सफर – १\u003c\/h2\u003e\n\u003cp\u003e‘ऑफबीट’ राहील याबाबत आग्रही राहून ते तब्बल १०७ देश फिरले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभटकंतीच्या एका टप्प्यावर त्यांनी क्रूझ सफरीचा अनुभव घेतला आणि अशा सफरीच्या ते प्रेमातच पडले. मग ५-१५ दिवसांच्या क्रूझ सफरी करता करता त्यांनी पुढील क्रूझ निवडली ती ३१ दिवसांची.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसफरीत पाहिलेली कॅरेबियन बेटं ही अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण… हॉलंडची छोटी प्रतिकृती ‘कुरासावा’, स्नॉर्कलिंग-डायव्हिंगचे पॅराडाइज ‘बोनेर’, क्रिकेटची पंढरी ‘अँटिग्वा अँड बर्बुडा’, अमेरिकेचे व्हेनिस-‘फोर्ट लॉडरडेल’, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बॅरियर रीफ ‘बेलिझ’, भारताशी अनोखे नाते असणारा ‘जमैका’… अशा कितीतरी सुंदर बेटांची सफर जयप्रकाश आपल्याला घडवून आणतात… सफरीत लिहिलेल्या रोजनिशीच्या अर्थात ‘डायरी’च्या माध्यमातून !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e३१ दिवसांच्या धावत्या रंजक चित्रणाची ‘डायरी’… ऑफबीट क्रूझ सफर : १\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch2\u003e\u003cstrong\u003eऑफबीट क्रूझ सफर – २\u003c\/strong\u003e\u003c\/h2\u003e\n\u003cp\u003eगेल्या २८ वर्षांपासून जयंती आणि जयप्रकाश प्रधान देश-विदेशात भटकंती करत आहेत. आपली भटकंती ‘ऑफबीट’ राहील याबाबत आग्रही राहून ते तब्बल १०७ देश फिरले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e५-१५-३० दिवसांच्या क्रूझ सफरी करता करता त्यांनी पुढची क्रूझ निवडली ती ५१ दिवसांची ! आणि या सफरी दरम्यानच त्यांच्या देशभ्रमंतीचं शतकही पूर्ण झालं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वर्गसमान अशा ७ देशांच्या १२,५६७ नॉटीकल मैल जलप्रवासाचा हा रंजक अनुभव. ही बेटं या दोघांसाठी पूर्णपणे अपरिचित होती. या सफरीत त्यांनी पृथ्वीवरील पहिला सूर्योदय आणि पृथ्वीवरील शेवटचा सूर्यास्तही अनुभवला. तर, एक तारीख चक्क दोनदा अवतरल्याची जादूही अनुभवली. अशा अनुभवांची तसेच हवाई बेटे, अमेरिकन समोआ, ३० टक्के हिंदू लोकसंख्या असलेले फिजी बेट, राजेशाही थाटातले टोंगा बेट, निसर्गरम्य अशी कूक आयलँड्स आणि फ्रेंच पॉलिनेशियातील बोरा बोरा, ताहिती आणि मुरिया या बेटांची रंजक वर्णनं या पुस्तकातून त्यांनी रेखाटली आहेत…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिसर्गाची विविधरंगी, विविधढंगी रूपं डोळ्यांपुढे उभी करणारं… \u003cstrong\u003eऑफबीट क्रूझ सफर : २\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"rohan prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68168720318684,"sku":null,"price":530.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/website-free-poster_08f9e367-1511-48e1-a2f3-7cbdf0f91a3f.png?v=1794246537","url":"https:\/\/ganam.in\/products\/offbeat-cruise-safar-set-%e0%a4%91%e0%a4%ab%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%9d-%e0%a4%b8%e0%a4%ab%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%9f-by-jayprakash-pradhan-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}