{"product_id":"maunachi-bhasha-aani-darbhacha-manus-by-arun-jakhade","title":"Maunachi Bhasha Aani Darbhacha Manus | मौनाची भाषा आणि दर्भाचा माणूस By Arun Jakhade| अरुण जाखडे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभीमा-सरस्वतीच्या पवित्र संगमावर वसलेलं पेडगाव आणि बहुतालची गावं, तिथला परिसर, तिथली साधी पण संस्थानांसारखी माणसं, शेतमाती, ऐतिहासिक वास्तू, आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने तेजस्वी झालेला बहादूरगडाचा इतिहास... हे या पुस्तकातील वेगवेगळ्या लेखांचे स्वतंत्र ‘नायक’ म्हणून आपल्यासमोर येतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरंतु या सर्व घटकांना जोडणारा खरा दुवा म्हणजे या आत्मकथेचा मुख्य नायक - स्वतः लेखक आहे! या मातीचा, संस्कृतीचा आणि बदलत्या काळाचा लेखकाच्या स्वतःच्या जडणघडणीवर आणि पुढील शहरी आयुष्यावर नेमका काय ठसा उमटला, याचा एक अत्यंत जिव्हाळा असलेला आणि प्रांजळ पट या पुस्तकातील प्रत्येक लेखाबरोबर उलगडत जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘मौनाची भाषा आणि दर्भाचा माणूस’ हे केवळ एका गावाचे किंवा ग्रामीण संस्कृतीचे संकीर्ण वर्णन नाही; तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वावर आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवणार्या अरुण जाखडे यांच्या समृद्ध जीवनप्रवासाची एक नितळ, आत्मकथनात्मक शिदोरी आहे. पद्मगंधा प्रकाशनचे संस्थापक, वेगळ्या धाटणीची पुस्तके आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारणारे प्रकाशक तसंच एक साक्षेपी संपादक म्हणून अरुण जाखडे यांची ओळख असली तरी ते सतत रमत राहिले ते ग्रामीण भूमिपुत्राच्या भूमिकेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपारंपरिक आत्मचरित्राची एक ठरावीक चौकट असते. प्रसंगामागे प्रसंग, समकालीन काळ आणि व्यक्तींची जोडणी करत उलगडणारी नायकाची जीवनकहाणी! पण हे पुस्तक त्या चौकटीत मावणारे नाही. म्हणूनच ही केवळ लेखकाची आत्मकथा राहत नाही. निसर्गाची ‘मौनाची भाषा’ समजून घेणार्या आणि शहरात यशस्वी होऊनही घड्याळाच्या काट्यावर जगताना माणूसपण शोधणार्या प्रत्येकालाच त्यात आपला अंश सापडेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"padamagandha prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52397952958684,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/MaunachiBhashaaniDarbhachaManus_Covercopy-500x500.jpg?v=1788281065","url":"https:\/\/ganam.in\/products\/maunachi-bhasha-aani-darbhacha-manus-by-arun-jakhade","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}