Ganam
Marathyanchya Itihasatil Nivadak Patranchi Parshavbhumi By Dr. H. Y. Kulkarni (मराठ्यांच्या इतिहासातील निवडक पात्रांची पार्श्ववभूमी)
Marathyanchya Itihasatil Nivadak Patranchi Parshavbhumi By Dr. H. Y. Kulkarni (मराठ्यांच्या इतिहासातील निवडक पात्रांची पार्श्ववभूमी)
Couldn't load pickup availability
१८१८ साली मराठ्यांचे राज्य खालसा करून इंग्रजांनी आपला अंमल चालू केला. शनिवारवाड्यातील दप्तर हलवून नानावाड्यात आणून ठेवले. कालांतराने या कागदपत्रांसाठी स्वतंत्र इमारत बांधून तिथे सर्व कागदपत्रे हलविली. यालाच पुढे 'पेशवे दप्तर' असे नामाभिधान प्राप्त झाले. या कागदपत्रांचे कार्यालयीन, राजकीय, खासगी आणि अर्थविषयक कागदपत्रे असे ढोबळमानाने वर्गीकरण करत येते. यात जवळजवळ ९० प्रकारची कागदपत्रे आहेत. मराठेशाहीच्या इतिहासाची अस्सल साधने म्हणजे हा मोडी लिपीतील अगणित पत्रव्यवहार आहे. राजकीय पत्रे कित्येकवेळा शत्रूच्या हातात सापडण्याची शक्यता असे, त्यामुळे मूळ पत्र कोणी, कोणास, कशासाठी पाठविले ते लिहीत नसत. नंतरच्या काळात अशी पत्रे संभ्रम निर्माण करणारी ठरतात. या पत्रांची उकल इतिहास संशोधक आडाखे बांधून करतात.
अशी असंख्य कागदपत्रे इतिहास संशोधकांच्या हाती आल्यामुळे त्यांना सुसंगत इतिहास लिहून आपल्यापर्यंत पोहोचवता आला.
मराठ्यांच्या इतिहासातील शिवकालीन व पेशवेकालीन काही निवडक पत्रांची तसेच इतर कागदपत्रांतून समजणाऱ्या काही प्रसंगांची पार्श्ववभूमी या पुस्तकात कथन केलेली आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.