{"product_id":"marathi-sattecha-rajkiya-itihas-मराठी-सत्तेचा-राजकीय-इतिहास-by-dr-r-h-kamble-डॉ-आर-एच-कांबळे","title":"Marathi Sattecha Rajkiya Itihas | मराठी सत्तेचा राजकीय इतिहास By Dr. R. H. Kamble | डॉ. आर. एच. कांबळे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"महाराष्ट्रामध्ये इ. स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावरून मराठ्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण झाल्याचे व छत्रपती शिवाजी महाराज त्या राज्याचे अभिषित राजे म्हणून सिंहासनाधिष्ठित झाल्याचेही अधिकृतपणे जाहीर झाले. त्यानंतर अनेक आव्हानांना तोंड देत मराठ्यांचे राज्य टिकले आणि त्यातून मराठा साम्राज्य उदयास आले. इ. स. १८१८ मध्ये पुण्याची पेशवाई संपुष्टात आली आणि सातार्याचे राज्यकर्ते इंग्रज राज्यकर्त्यांच्या हातातील खेळण्यासारखे राहिले. परंतु ‘मराठ्यांचा इतिहास’ असा व्यापक शब्दप्रयोग करतो तेव्हा छत्रपतींची असो, पेशव्यांची असो किंवा शिंदे-होळकरांसारख्या सरदारांची असो, जर महाराष्ट्रातील लहान-मोठ्या लढवय्यांनी आणि मुत्सद्द्यांनी मिळून सत्तेचा विस्तार केला असेल आणि इतिहासाला बरेवाईट वळण लावले असेल तर ते सर्वच मराठ्यांची सत्ता म्हणून ओळखले आणि तपासले गेले पाहिजे. सदर पुस्तकात मराठी सत्तेच्या उदयापासून अस्तापर्यंतच्या समग्र इतिहासाची विस्तृत चर्चा वाचायला मिळेल. हे पुस्तक इतिहासाचे अभ्यासक आणि सामान्य वाचक अशा सर्वांना भावेल अशी खात्री वाटते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52157597024476,"sku":null,"price":354.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/wer.jpg?v=1785743354","url":"https:\/\/ganam.in\/products\/marathi-sattecha-rajkiya-itihas-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-by-dr-r-h-kamble-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%86%e0%a4%b0-%e0%a4%8f%e0%a4%9a-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b3%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}