{"product_id":"manasshastriya-chhachanya-मानसशास्त्रीय-चाचणी-by-prof-keshav-gadekar-प्रा-केशव-गाडेकर","title":"Manasshastriya Chhachanya | मानसशास्त्रीय चाचणी By Prof. Keshav Gadekar | प्रा. केशव गाडेकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानसशास्त्र हे मानवी मन, वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास करणारे ज्ञानशास्त्र आहे. मानवी वर्तनामध्ये आढळणारी विविधता, व्यक्तीभिन्नता, बौद्धिक क्षमता, अभिक्षमता, व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आणि मानसिक गुणधर्म यांचे शास्त्रीय आकलन करण्यासाठी मानसशास्त्रीय मापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मापनप्रक्रियेत मानसशास्त्रीय चाचण्या हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमानसशास्त्रीय चाचणी म्हणजे केवळ काही प्रश्न विचारून गुण देण्याची प्रक्रिया नव्हे. एखाद्या मानसशास्त्रीय गुणधर्माचे शास्त्रशुद्ध मापन करण्यामागे संकल्पनात्मक स्पष्टता, योग्य चाचणी-रचना, प्रमाणित प्रशासन, वस्तुनिष्ठ गुणांकन, विश्वसनीयता, यथार्थता आणि योग्य मानदंड यांचा भक्कम आधार असतो. म्हणूनच मानसशास्त्रीय चाचण्यांचा अभ्यास हा मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ अभ्यासक्रमाचा एक भाग नसून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया जाणिवेतून प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. हा ग्रंथ तयार करताना विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय चाचण्यांविषयी केवळ परिभाषात्मक माहिती न मिळता ‘चाचणी म्हणजे काय? ती कशी विकसित केली जाते? तिचे शास्त्रीय मूल्यमापन कसे केले जाते? तिच्या प्राप्तांकांचा अर्थ कसा लावला जातो? आणि तिचा जबाबदारीपूर्वक वापर कसा करावा?’ या प्रश्नांची सुसंगत उत्तरे मिळावीत, हा प्रमुख हेतू मनात ठेवला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67755079565532,"sku":null,"price":440.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/1216-manasshatriyachachanifr_1024x1024_2x_e6ebae02-f6a5-4d92-a780-31b58af57db3.webp?v=1792083863","url":"https:\/\/ganam.in\/products\/manasshastriya-chhachanya-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%a3%e0%a5%80-by-prof-keshav-gadekar-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b5-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}