{"product_id":"khadyavanaspatincha-adbhut-pravas-by-dr-mandar-n-datar","title":"Khadyavanaspatincha Adbhut Pravas| खाद्यवनस्पतींचा अद्भुत प्रवास By Dr. Mandar N.Datar | डॉ. मंदार नि. दातार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या जेवणात नेमके काय असेल? त्यांनी बटाटा, मिरची यांचा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआस्वाद घेतला असेल का? सम्राट चंद्रगुप्तांच्या दरबारात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोणती फळे देऊन केले जात असेल? कालिदासाच्या काळात सणासुदीच्या मेजवानीत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाय पदार्थ असतील? सिंधू संस्कृतीतील लोक काय खात असतील? या प्रश्नाची उत्तरे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्याला इतिहासाची पुस्तके वाचून मिळत नाहीत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइतिहास म्हणजे केवळ तलवारींचा खणखणाट आणि तोफांचा दणदणाट नसतो. जगाचा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसगळा इतिहास हा खरे तर खाद्य वनस्पतींचाच इतिहास आहे. सम्राट अलेक्झांडरच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वारीनंतर जगाला अनेक उपयुक्त भारतीय वनस्पतींचा परिचय झाला. चहाच्या अन्\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअफूच्या व्यापारामुळेच इंग्रजांची चीनशी युद्धे झाली. भारतातून होणारा मसाल्यांचा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव्यापार ताब्यात ठेवण्यासाठी झालेल्या युरोपियन राष्ट्रांच्या स्पर्धेमुळे जगातील अनेक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रांतांना गुलामगिरीचे जोखड गळ्यात अडकवून घ्यावे लागले. कोलंबसच्या अमेरिकेला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपोचण्यातून अनेक नव्या वनस्पती जगभरातील खवय्यांच्या पानात दाखल झाल्या.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबोस्टन टी पार्टीने अमेरिकन क्रांतीची ठिणगी पेटवली. बांदा बेटांवरची दुर्दैवी कत्तल\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसो किंवा आयर्लंडमधला बटाट्याचा दुष्काळ असो की कॉफी हाऊसेसने युरोपमध्ये\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकेलेली वैचारिक क्रांती असो, या आणि अशा अनेक जागतिक महत्त्वाच्या घटना खाद्य\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवनस्पतींशीच संबंधित आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतेव्हा आज आपल्या ताटात पडणाऱ्या या अशा देशोदेशीच्या फळांचा, भाज्यांचा, धान्यांचा,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमसाल्यांचा आणि त्यांच्या इतिहास-भूगोलाचा हा एक अद्भुत गोष्टीरूपातला परिचय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"manovikas prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68082628362460,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Khadyavanaspaticha-adbhut-pravas.jpg?v=1793984627","url":"https:\/\/ganam.in\/products\/khadyavanaspatincha-adbhut-pravas-by-dr-mandar-n-datar","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}