{"product_id":"kartavyapurti-कर्तव्यपूर्ती-by-anand-bapat-subhash-bhave-आनंद-बापट-सुभाष-भावे","title":"Kartavyapurti कर्तव्यपूर्ती By Anand Bapat Subhash Bhave आनंद बापट सुभाष भावे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसशस्त्र सेनादलातील शिपाई व अधिकार्यांविषयी सामान्यजनांच्या मनात नेहमीच एक सुप्त आकर्षण असते. सैन्यदलातील कठोर अनुशासन, खडतर प्रशिक्षण, सीमावर्ती व दुर्गम प्रदेशात कुटुंबापासून दूर राहून व्यतीत केलेला सेवाकाळ, शत्रूसोबत झालेल्या चकमकी आणि त्यामधून सैनिकांनी गाजवलेली मर्दुमकी, अशा विषयांवरच्या रम्य कथा ऐकण्यात सर्वांनाच औत्सुय वाटते. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरमवीर चक्र किंवा तत्सम शौर्यपदके प्राप्त केलेल्या वीरांच्या अनेक कथा आजवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. परंतु, प्रत्येक सैनिकाच्या आयुष्यात कधी ना कधी, अत्यंत अवघड असे परीक्षेचे क्षण येऊन गेलेले असतात. भारतीय सैन्यदलांमध्ये असेही असंख्य वीर आहेत ज्यांनी शत्रूसोबत लढताना किंवा इतर काही कठीण प्रसंगांमध्ये असामान्य कामगिरी केलेली आहे, परंतु त्यांना प्रसिद्धीचे वलय लाभलेले नाही. भारतीय नौदल, हवाई दल आणि भूदलातील अशाच काही शूर सैनिक व अधिकार्यांच्या एकवीस सत्यकथांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. आजवर प्रकाशझोतात न आलेल्या वीरांच्या कथादेखील वाचकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने हे पुस्तक आम्ही संपादित केले आहे. लेखकांचा अल्प परिचयदेखील त्यांच्या कथांसोबत दिलेला आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयुद्धाच्या रम्य गोष्टी ऐकता-ऐकता, कधीतरी त्या कथा ऐकणार्यांना स्वतःच अशा एखाद्या युद्धकथेचा भाग होण्याची स्फूर्ती मिळावी हा या पुस्तकाचा खरा हेतू आहे. या पुस्तकातील शौर्यकथा जर अधिकाधिक लोकांनी, आणि विशेषतः किशोरवयीन मुलामुलींनी व तरुण-तरुणींनी वाचल्या आणि त्यातून प्रेरणा घेऊन असेच शूरवीर घराघरातून उदयाला आले, तर या कथांचे मूळ लेखक आणि प्रस्तुत पुस्तकाचे संपादक भरून पावतील. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52042531373276,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/1197-kartavyapurti-fr_1024x1024_2x_bf402e15-4aa9-4a35-ac47-e79a07e39bb4.webp?v=1783964797","url":"https:\/\/ganam.in\/products\/kartavyapurti-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-by-anand-bapat-subhash-bhave-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}