Skip to product information
1 of 1

rohan prakashan

Kamayani कामायनी By Girish Jakhotiya गिरीश जाखोटिया Pre Booking

Kamayani कामायनी By Girish Jakhotiya गिरीश जाखोटिया Pre Booking

Regular price Rs. 0.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 0.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

कामायनी

मूळ राजस्थानी असलेली कामायनी ही कोची, केरळात जन्मते-वाढते. केरळातील तिची ही पाचवी पिढी. अत्यंत हुशार, कर्तबगार, निडर व तर्कशुद्ध विचार करणारी कामायनी जोधपूरच्या एका उमद्या तरुणाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करते. सासर रूढीवादी असल्याने लग्नानंतर तिचा जीवनसंघर्ष सुरू होतो. या संघर्षाचं मूळ दोन भिन्न प्रकृतीच्या संस्कृती यात रुजलेलं असतं.

ही कादंबरी म्हणजे अशा दोन संस्कृतींमधला टकराव होय. इतिहास आणि परंपरांमध्ये अडकलेलं एक राज्य, तर दुसरं प्रगतिशील विचारांची कास धरणारं!

कामायनी आपला पती, कुंवर आणि घट्ट मैत्रीण चार्वी यांच्या मदतीने स्त्रियांसाठी, तसंच दोन्ही राज्यांतील आदिवासींच्या उत्कर्षासाठी आपलं आयुष्य झोकून देते. तिने जाणीवपूर्वक विकसित केलेलं बहुउद्देशीय, बहुभाषिक, बहुराष्ट्रीय मित्रांचं नेटवर्क तिला विश्वकन्या बनवून टाकतं. मात्र एवढं करून ती समाजाला जात-पात विसरायला लावू शकते का?

आदिवासी कल्याणाचं तिचं स्वप्न पूर्ण होतं का?

सामाजिक कामात येणाऱ्या अडथळ्यांवर, पाय खेचणाऱ्या पुरुषी वर्चस्वावर ती मात करण्यात यशस्वी होते का?

नियतीचा न्याय आणि मानवी जिद्द यांमधील अनोख्या जुगलबंदीची संघर्षमय कहाणी… कामायनी!

View full details