{"product_id":"kadhi-bahar-kadhi-shishir-by-mangala-godbole","title":"Kadhi Bahar Kadhi Shishir | कधि बहार कधि शिशिर By Mangala Godbole |  मंगला गोडबोले","description":"\u003cp\u003e'फुल टू धमाल' म्हणजे काय ? 'रेडिओ मिरची' हे काय प्रकरण आहे ? टी-व्ही 'कोथिंबीर' का नसावी ? 'मी तुझी मदत करतो, तू माझी कर,' हे काय आहे ? मदत 'माझी' करतात का मला करतात ? नारळ खवणणे म्हणजे काय? रताळ्याचा खीस कुठला? आलं-लसणाची पेस्ट कशी बनते? त्याच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्या, म्हणजे नक्की काय समजून घ्यायचं ? 'मानसिकता' हे काय लफडं आहे ? आधीच मन, पुढे मानस, पुढे 'इक' प्रत्यय लागून मानसिक, पुढे निष्कारण मानसिकता, आता त्याही पुढे 'मानसिकताई' म्हणायला लागायचं का? सूतकताईसारखं ? पोरांना शाळेत घालतात की टाकतात ? 'जेवण बनवलं का?' हा काय प्रश्न आहे ? 'स्वयंपाक केला का ?' असं म्हणता येणार नाही का ? साडी घालतात का ? स्वेटर शिवतात का ? झाडू लावतात का ? जेवण लावलंय म्हणजे 'खाना लगाया है' असंच ना ? पुढ जाऊन ते वक्ते म्हणाले... ही काय कृती आहे ? कशाच्या पुढे जाऊन ? फार पुढे गेले तर स्टेजवरून पडतील ना बिचारे... 'आगे चलके उन्होने कहा' असं हिंदीत असतं, म्हणून आपणही पुढे जाऊन बोलायचं ? बघावं तो कार्यक्रम बेटा 'संपन्न' कसा होतो ? आणि त्या ठिकाणी एखादी मरतुकडी समई शंभरदा काड्या ओढत, कशीबशी लावली की झालं दीपप्रज्वलन. ही मायमराठी की माय मराठी ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीवनात पदोपदी येणाऱ्या अशा अनेक गमतीदार; पण भेदक क्षणांचं थेट चित्रण तुम्हाला (कदाचित) अंतर्मुख करून विचार करायला लावेल, तरच सौ. मंगला गोडबोले यांच्या या पुस्तकाचा प्रपंच सार्थ होईल\u003c\/p\u003e","brand":"navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68237477380316,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/IMG_0770.webp?v=1794417390","url":"https:\/\/ganam.in\/products\/kadhi-bahar-kadhi-shishir-by-mangala-godbole","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}