{"product_id":"jativyavastha-aani-pitrusatta-जातिव्यवस्था-आणि-पितृसत्ता-by-periyar-e-v-ramasamy-पेरियार-ई-व्ही-रामासामी-sagar-bhalerao-सागर-भालेराव","title":"Jativyavastha aani Pitrusatta  जातिव्यवस्था आणि पितृसत्ता By Periyar E v ramasamy पेरियार ई. व्ही. रामासामी  Sagar Bhalerao सागर भालेराव","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजात आणि पितृसत्ता यांसंबंधी पेरियार काय विचार करत होते आणि आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी त्यांचे निर्मूलन करणे अपरिहार्य आहे; असे का मानत होते, या प्रश्नांची सुस्पष्ट उत्तरे या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत. या पुस्तकातील परिशिष्ट या विभागात पेरियार यांच्या संपूर्ण जीवनाचा वर्षवार लेखाजोखा मांडण्यात आला आहे. पेरियार सुमारे ९४ वर्षे जगले. त्यांनी आयुष्यभर सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. या काळात त्यांनी केलेले लेखन व भाषणे यांतील महत्त्वाची उद्धृते यांचाही या भागात समावेश केला आहे. याशिवाय, या भागात पेरियार यांच्या कार्याचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी लिहिलेले तीन लेखही समाविष्ट केले आहेत. यांपैकी पहिल्या लेखात प्रसिद्ध विदुषी ललिता धारा यांनी महिलांसंबंधीचे पेरियार यांचे विचार, लेखन आणि संघर्ष यांचे विविध आयाम मांडले आहेत. दुसरा आणि तिसरा लेख पेरियार यांच्या सामाजिक संघर्षांचे सखोल आणि विस्तृत विश्लेषण करतो. हे लेख टी. थमराईकन्नन, व्ही. गीता आणि एस. व्ही. राजदुराई यांनी लिहिले आहेत. हे तिघेही पेरियार यांचे विचार व कार्य यांचे चिकित्सक अभ्यासक मानले जातात. या पुस्तकातील शेवटच्या भागात पेरियार यांचे विचार, लेखन आणि संघर्ष यांविषयीच्या विविध टप्प्यांचा तपशीलवार आराखडा मांडण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"madhushree publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":50959082914012,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/book-cover-for-website-83.jpg?v=1780337292","url":"https:\/\/ganam.in\/products\/jativyavastha-aani-pitrusatta-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%83%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be-by-periyar-e-v-ramasamy-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%88-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-sagar-bhalerao-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}