{"product_id":"good-news-aahe-by-arun-gadre","title":"Good News Aahe By  Arun Gadre","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e“गुड न्यूज!’’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e“प्रेग्नन्सी कन्फर्म झाली आहे’’ असं डॉक्टरांनी सांगताच,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआजच्या विचारी स्त्रीला आनंद तर होतोच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपण पुढचे नऊ महिने तिला अनेक कोडी घालत येणार असतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआजच्या धावपळीच्या युगात शंका-समाधान करायला डॉक्टरांना\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eवेळच नाही... अन् पेशंटलाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपण वेळोवेळी प्रश्न तर पडतातच!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e“गर्भारपणी केली जाणारी सोनोग्राफी बाळासाठी सुरक्षित आहे का?’’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e“मला गर्भपाताचा धोका तर नाही?’’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e“डिलीव्हरी प्रीमॅच्युअर तर होणार नाही?’’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e“खाण्या-पिण्यात काय काळजी घ्यायची?’’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e“आईकडे जायचंय... प्लेननं जाणं सुरक्षित आहे ना?’’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e“व्यायाम करायचे तर कुठले?’’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e“सीझरच होतं हल्ली, नॉर्मल डिलीव्हरी करतच नाहीत डॉक्टर.’’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e...अनेक शंका-कुशंका.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eया दूर करायला\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eवीस वर्ष अनुभव असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ - जे कादंबरीकारही आहेत -\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eएका अनोख्या शैलीत थेट - या गर्भवतीबरोबर या पुस्तकात हितगूज \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकरत आहेत. एका दृष्टीनं हे... जवळ बसून सांगितलेल्या या हिताच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eगोष्टी म्हणजेच... उपनिषद आहे. आधुनिक वैज्ञानिक मातृत्व उपनिषद!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eचार शब्द\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमातृत्व व बाळंतपण हे सनातन काळापासून माणसाच्या जीवनाचे व \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसंस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. अवघ्या दोनशे वर्षांपूर्वी येथे दर तीन \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eगर्भार स्त्रियांपैकी एक स्त्री बाळंतपणात मृत्यू पावत होती. त्यामुळे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e'बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म' ही कल्पना आजही कुठेतरी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रत्येकाच्या सुप्त मनात दडलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमात्र गेल्या पन्नास वर्षात काळ कुठून कुठे गेला आहे! तंत्रज्ञान व \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eविज्ञानानं प्रचंड झेप घेतली आहे. गर्भारपण व बाळंतपण या क्षेत्रातही \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eतंत्रज्ञान व विज्ञानाचं खूप आक्रमण झालेलं आहे. मोठ्या शहरात \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबाळंतपण घरी होणं हे जवळपास दिसेनासं होतय. प्रेग्नन्सी आता \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eएक 'मेडिकल इव्हेन्ट'... 'डॉक्टरी बाब' झाली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eतर, तसं उरलं नाही ही वस्तुस्थिती आहे. अनुभवी, जुन्या जाणत्या\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबायका आता पहिलटकरणीच्या जवळपास नसतात. एकेकटी बायको...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअशा छोट्या परिघात ती स्त्री जेव्हा प्रेग्नन्ट होते, एका खूप काही गोंधळाला \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआणि चिंतेला जन्म देताना दिसते. खरं पाहता, विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीनं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआता बाळंतपण, गर्भारपण खूपच सुरक्षित झालं आहे..!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपण ते तेवढं आनंदी... नैसर्गिक राहिलं आहे का? स्त्री हल्ली करीअर करणारी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआहे. ती चार भिंतीत बंदिस्त नाही. जास्त वेळा गर्भारपण आता परवडत नाही. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eएकच. वा फार तर दोन! साहजिकच आता खूप काही अपेक्षांचं ओझं या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eगर्भारपणावर, बाळंतपणावर व पर्यायानं स्त्रीरोगतज्ज्ञावर पडू लागलं आहे!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eडॉक्टर-पेशंट संवाद आता आक्रसला आहे. वेळ नाही कुणाकडेच. वाढलेल्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअपेक्षा, शंकाकुशंका आणि डॉक्टरांबद्दल निर्माण झालेला अविश्वास या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसर्वांमुळे प्रेग्नन्सीचा, गर्भारपणाचा आनंद घुसमटतो आहे..\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e'सीझर' या तोन अक्षरी शब्दाचं भूत बाळंतपणाच्या मानगुटीवर बसलं आहे! \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eउत्तरं मिळत नाहीत... प्रश्न संपत नाहीत... अशीच अवस्था. ही कोंडी फोडायलाच \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक लिहिले जात आहे. गर्भार स्त्री व स्त्रीरोगतज्ज्ञ या दोघांना एकमेकांकडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजे पोचवावंस वाटतं ते पोचवावं, त्या दोघांचा हात एकमेकात गुंफून द्यावा... \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआणि डॉक्टरांबद्दलचा अविश्वास कमी व्हावा ही इच्छा आहे. कोणताही संवाद \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहा गैरसमज व चुकीच्या माहितीच्या पायावर घडू शकत नाही. त्यामुळे या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचा मूळ उद्देश, आजच्या सुशिक्षित, समंजस व चौकस स्त्रीला आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eतिच्या नवऱ्याला पुराव्यानं सिद्ध अशी माहिती (Evidence based practices) \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eदेणे हा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहा माहितीचा नकाशा आहे. तो जवळ असेल तर प्रत्येक प्रेग्नन्ट स्त्रीला एक \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहोकायंत्र जवळ मिळेल, ती तिच्या डॉक्टरांना योग्य प्रश्न विचारू शकेल, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eती तिच्या डॉक्टरांची बाजू नीट समजावून घेऊ शकेल ही लेखकाची खात्री \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआहे. म्हणून हे उपनिषद (जवळ बसवून केलेले हितकारक मार्गदर्शन) \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआहे!!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमातृत्वाबद्दलचं आहे.. म्हणून 'मातृत्व उपनिषद:\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसध्या मराठीत गर्भसंस्कारांवर काही पुस्तक उपलब्ध आहेत. माझ्या शास्त्रातील \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eती नसल्यामुळे ती Evidence based आहेत का नुसती सदिच्छा. हे मी सांगू \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eशकणार नाही. मात्र, एक प्रश्न मला होणाऱ्या प्रत्येक मातेला व पालकांना \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनक्की विचारायचा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआपण आपल्या गर्भाबद्दल, बाळाबद्दल काही चुकीच्या, अवास्तव अपेक्षा ठेवत नाही ना?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eज्ञानेश्वर, आइन्स्टाइन हे अपवाद !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eचमत्कार!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआपलं मूल असं चमत्कारच असावं असा वेडा अट्टाहास का ? शक्य आहे का \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eते? अन गर्भारपणीच आपण असा चुकीचा हट्ट करणार असू तर पालक म्हणून \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआपण कसे वागू? भानावर या. या प्रश्नाचा नीट विचार करा हा माझा मित्रत्वाचा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसल्ला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसाहजिकच पुस्तक गर्भसंस्कारा सारख्या पुस्तकाप्रमाणे काही अवास्तव दावा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकरत नाही. हे पुस्तक एवढच सांगू इच्छित की, जे काही दान आपल्या पदरात \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eदिलंय ते परिपूर्णतेनं लाभाव !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआपल्या बाळाची जी जनुकीय देणगी (Genetic pool ) आहे ती पूर्णत्वान \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसफल व्हावी. गर्भारपणातले व बाळतपणातले त्रास कमी व्हावेत. त्यातले धोके \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eटाळण्यासाठी सावधानता बाळगता यावी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहे सर्व शक्य आहे! नक्की शक्य आहे. नवरा बायको जाडीने मिळून ही प्रेग्नन्सी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआनंदी करण हे सहज शक्य आहे. ज्ञान हे नेहमीच आनदाचा पाया असते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eते देण्याची ही तळमळीची धडपड लासलगावात २० वर्षप्रवास करत कली. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपाच हजाराच्या आसपास बाळतपण करताना जी काही अनुभव झाला तो \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रेग्नन्ट स्त्रीकडे पोचवण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न. सदिच्छा हीच की. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रत्येक मातेच... प्रत्येक बाळाच... आरोग्य त्यांना त्यांना भरभरून मिळावं!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eGood News Aahe : Arun Gadre\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eगुड न्यूज आहे! अर्थात मातृत्व उपनिषद डॉ. अरुण गद्रे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":50263848222940,"sku":null,"price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/good-news-ahe-296-800x800.jpg?v=1778691056","url":"https:\/\/ganam.in\/products\/good-news-aahe-by-arun-gadre","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}