manovikas prakashan
Gatha Bhartiya Nivadnukanchi | गाथा भारतीय निवडणुकांची By Dr. Vijay Chormare | विजय चोरमारे
Gatha Bhartiya Nivadnukanchi | गाथा भारतीय निवडणुकांची By Dr. Vijay Chormare | विजय चोरमारे
Couldn't load pickup availability
इतिहास रोमहर्षक असतो आणि राजकारण चैतन्यदायी असते.
या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्यातला जिवंतपणा खिळवून
ठेवणारा असतो. भारतातील निवडणुकांचा इतिहासही असाच पानोपानी
रोमांचक आहे. त्याची प्रचीती या पुस्तकातून येते. वाचनीयता आणि
संदर्भमूल्य असे दोन्ही गुण असलेले हे पुस्तक मराठीतील एक दुर्मिळ
दस्तऐवज म्हणता येईल. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशात
लोकशाही कशी रुजत गेली याचे दर्शन यातून घडतेच, परंतु सत्तेच्या
माध्यमातून रुजलेली लोकशाही उखडून टाकण्याच्या प्रयत्नांवरही
प्रकाश टाकते. भारतातील निवडणुकांवर अनेक भाषांमध्ये असंख्य
पुस्तके प्रसिद्ध आहेत. परंतु भारतीय निवडणुकांचा इतिहास मांडणारे
एवढे समग्र पुस्तक मराठीत नव्हे, तर कोणत्याही भाषेतील पहिलेच
पुस्तक असावे. राजकारणाची रुची असणाऱ्या प्रत्येकासाठी,
प्रसारमाध्यमांतील लोकांसाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी
हे पुस्तक दिशादर्शक ठरेल. इतिहासाची मांडणी करताना त्यातील
रंजकता हरवणार नाही, याचे पुरेपूर भान लेखक विजय चोरमारे
यांनी राखले आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.