{"product_id":"gandhiji-ani-tyanche-tikakar-marathi-गांधीजी-आणि-त्यांचे-टीकाकार-by-suresh-dwadashiwar-सुरेश-द्वादशीवार","title":"Gandhiji Ani Tyanche Tikakar (Marathi गांधीजी आणि त्यांचे टीकाकार By Suresh Dwadashiwar सुरेश द्वादशीवार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतोवर सारी राजकीय व सामाजिक स्थितीच बदलली होती. गांधीजींचा गौरव थांबला होता. त्यांची उणीदुणी काढणे सुरू झाले होते. देशाचे नवे सत्ताधारी, त्यांचे प्रचारक व हस्तक गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लोकलढा आणि त्यात केलेले बलिदान पुसून टाकायला निघाले होते. गांधी हा राष्ट्रपिता जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता. त्याला त्याच्यावरील आरोपांना उत्तरे देता येत नव्हती आणि ती देता येणार असती तरी त्या बॅरिस्टराने ते प्रश्न व टीका तशीच अनुत्तरीत ठेवली असती. काळ सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो असेच तो म्हणाला असता. टीकाकारांची टीका, त्या टीकेमागील त्यांच्या भूमिका, त्या टीकेतले खरेखोटेपण असे सारेच कधीतरी सांगावे, ते सांगताना त्या टीकाकारांना कमी लेखण्याचे साहस करू नये आणि त्यात गुंतलेल्या प्रत्येकच प्रश्नाचे स्पष्ट स्वरूप व त्याविषयी सर्व संबंधितांनी घेतलेल्या भूमिका पुढे याव्या असे मग मनाने घेतले. त्यातून हे लिखाण झाले आहे. हे लेखन परिपूर्ण आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल, यातली भूमिका तटस्थ नाही, ती सत्याच्या अधिकाधिक जवळ राहण्याची आहे!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"sadhana prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52091123007708,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/81_C4MvDHLL._SL1500.jpg?v=1784651217","url":"https:\/\/ganam.in\/products\/gandhiji-ani-tyanche-tikakar-marathi-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-by-suresh-dwadashiwar-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}