Ganam
Fahrenheit 451 By Ray Bradbury, Maya Pandit(Translator) (फॅरनहाईट ४५१)
Fahrenheit 451 By Ray Bradbury, Maya Pandit(Translator) (फॅरनहाईट ४५१)
Couldn't load pickup availability
फॅरनहाईट ४५१ ही भविष्यकाळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भयावह जगाचं भाकीत करणारी विलक्षण कादंबरी आपल्याला अक्षरशः झपाटून टाकते.
या भविष्यकालीन जगात पुस्तकांवर बंदी आलेली आहे आणि ती जाळण्यासाठी फायरफायटर्सचा एक खास टास्कफोर्स तयार करण्यात आला आहे. पुस्तकं लोकांमध्ये कमालीचा बेबनाव आणि भयंकर दुःखं पेरतात, म्हणून ती बाळगायला नि वाचायला बंदी आहे. गाय मॉन्टॅग या टास्कफोर्समधे काम करतो. त्याच्याही घरात पुस्तकं लपवलेली आहेत का? टास्कफोर्सनं एक यांत्रिक कुत्रा तयार केलाय. त्याच्या तोंडात जालीम विष भरलेली एक सुई बसवलेली आहे. त्याला हेलिकॉप्टरमधून इकडे तिकडे नेलं जातं. जी विद्रोही माणसं समाजाचे आदेश धुडकावून पुस्तकं सांभाळून ठेवतात नि वाचतात त्यांचा शोध घेऊन हा कुना त्यांचा निकाल लावतो.
ही कादंबरी जगाचा वाङ्मयोत्तर भविष्यकाळ आपल्यासमोर साक्षात उभा करते. या कादंबरीच्या प्रकाशनाला आता ५० वर्षे झाली आहेत, तरीही तिच्या धक्कादायक नि स्तिमित करणाऱ्या मांडणीमुळे तिची वाचकांवरची मोहिनी अद्यापही कायम आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.