{"product_id":"dhyas-ani-prayas-dr-ashok-veneemadhavshastri-joshi-by-dr-pandit-tapre","title":"Dhyas Ani Prayas : Dr. Ashok Veneemadhavshastri Joshi By Dr. Pandit Tapre","description":"\u003cp\u003eडॉ. अशोक वेणीमाधवशास्त्री जोशी यांनी भारत-अमेरिका येथील वास्तव्यात शास्त्रज्ञ व परोपकारी लघुउद्योजक म्हणून लौकिक मिळवला. जीवनातील प्रेयस आणि श्रेयस या दोन्हींची प्राप्ती त्यांनी कष्टपूर्वक केली असल्याने आज त्यांच्या नावावर शंभरहून अधिक पेटंट्स आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘आपल्या आत्म्याला जे स्पर्श करते ते यश’ अशी त्यांची यशाची व्याख्या राहिली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, समाजातील अभिरुचिसंपन्न उच्चभ्रूच्या, कर्तृत्ववान व्यक्तींच्या व संतत्व लाभलेल्या सत्पुरुषांच्या जीवनाशी ते जसे एकरूप होतात, तसेच उपेक्षित वंचितांच्या अन् अपंगांच्या जीवनाशीही ते एकरूप होतात. त्यांच्या ठायी सहानुभूतीपेक्षा करुणा अधिक आहे. म्हणूनच परोपकार, इतरांचा विकास व आनंद याविषयीचा ममत्वभाव आविष्कृत करीत त्यांची श्रेयसाकडील वाटचाल अधोरेखित होते. त्याचेच सुरेख दर्शन ‘ध्यास आणि प्रयास’ या संवादात्मक पुस्तकातून घडते.\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":47633409966300,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/rn-image_picker_lib_temp_bc9b544f-006b-48b8-9791-3afeec1d56c1.jpg?v=1772212879","url":"https:\/\/ganam.in\/products\/dhyas-ani-prayas-dr-ashok-veneemadhavshastri-joshi-by-dr-pandit-tapre","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}