saket prakashan
Chitrapatache Shastra चित्रपटाचे शास्त्र By Shiv Kadam शिव कदम
Chitrapatache Shastra चित्रपटाचे शास्त्र By Shiv Kadam शिव कदम
Couldn't load pickup availability
चित्रपट हे प्रेक्षकांच्या बाजूने मनोरंजन आणि निर्मात्यांच्या बाजूने धंदा असं मानलं गेलेलं संवादाचं उत्कट, प्रभावी आणि नेणिवेपर्यंत घुसणारं माध्यम आहे. सव्वाशे वर्षांत या तरुण कलेने आपलं आयुष्य अगदी व्यापून टाकलं आहे. चित्रपट बनवत बनवत त्याची चित्रपटीय भाषा शोधत शोधत पूर्वसुरींनी दिपवणारं काम केलं आहे. आज या कलेच्या वाटेवर प्रवास सुरू करणाऱ्याला या शोधांतून तयार झालेलं हे शास्त्र, चित्रपटीय परिभाषा आणि तिचं व्याकरण, त्यातले प्रयोग, त्यातल्या अनेक वाटा-आडवाटा, निरनिराळे सिद्धांत, बंडखोरी या गोष्टी अभ्यासणं अनिवार्य नाही; पण उपलब्ध नक्कीच आहे, पण परक्या भाषांमध्ये.
चित्रपटकलेचा इतिहास आणि अनेक प्रयोगांती उमजत गेलेलं शास्त्र अत्यंत सुलभ भाषेत; पण तांत्रिक तडजोड न करता डॉ. शिव कदम यांनी सादर केलं आहे. चित्रपट माध्यम आपल्या कलाविष्कारासाठी निवडलेल्या आणि या कलेकडे गांभीर्याने पाहणाऱ्या मराठी भाषक नवोदितांना हे पुस्तक म्हणजे पर्वणी ठरेल. असं पुस्तक वाचून तयार होणारी शास्त्रीय बैठक घेऊन या प्रवासाची सुरुवात कराल, तर प्रवास नुसता सुकर होणार नाही तर उद्दिष्टांकडे एकदम काही टप्पे ओलांडून पोहोचल्याची शिदोरी सापडल्याचं समाधान मिळेल, असा माझा सल्ला आहे.
हे पुस्तक अनेक नव्या कलावंतांना अशी ऊर्मी आणि समजूत नक्की देईल अशी आशा आणि सदिच्छा !
सुनील सुकथनकर
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.