sakal media pvt ltd
Bakhar Amerikechi बखर अमेरिकेची By Rahul Hande राहुल हांडे
Bakhar Amerikechi बखर अमेरिकेची By Rahul Hande राहुल हांडे
Couldn't load pickup availability
एका महासत्तेच्या उदयाची चित्तथरारक कथा !
बखर अमेरिकेची हे पुस्तक संपूर्ण अमेरिका खंडाच्या गेल्या चार शतकांतील ऐतिहासिक जडणघडणीचा व्यापक आणि सखोल शोध घेते; केवळ अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा 'यूएसए'चा विचार न करता, उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडांतील विविध देशांच्या संदर्भासह, विद्यमान महासत्तेच्या उभारणीचा प्रवास प्रवाही भाषेत उलगडते.
अमेरिका नावाचे राष्ट्र साकारत असल्याच्या काळाची ही गोष्ट, लेखक राहुल हांडे विविध संदर्भग्रंथांच्या आधारे, तटस्थ आणि अभ्यासू दृष्टिकोनातून चितारतात. तत्कालीन घटना-प्रसंग, व्यक्ती, मूल्ये यांचा आजच्या काळाशी, आपल्या आणि इतर राष्ट्रांशी, असलेला सहबंध उलगडून दाखवतात. व्यक्तिस्वातंत्र्य, समता, प्रजासत्ताक, अशा आधुनिक मूल्यांची प्रत्यक्ष उभारणी कशी झाली हे सांगतात !
जागतिक व्यापार, अर्थव्यवस्था आणि भू-राजकीय स्पर्धेच्या आजच्या काळात, जगावर प्रभाव टाकणाऱ्या 'अमेरिकी गरुडाची' झेप आणि संस्कृती समजून घेणे ही काळाची गरज आहे. ही वाटचाल समजून घेण्यासाठी एक महासत्ता… दोन खंड… आणि चार शतकांचा थरारक इतिहास मांडणारा महत्त्वपूर्ण, वाचनीय आणि संग्राह्य दस्तावेज बखर अमेरिकेची.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.