{"product_id":"aitihasik-wade-ani-gharane-by-sumit-dengale","title":"Aitihasik Wade Ani Gharane By  Sumit Dengale","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवरायांचे सरसेनापती माणकोजी दहातोंडे ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांच्यापर्यंतची मराठेशाहीतील काही वाडे आणि घराण्यांचा समावेश या पुस्तकात केला आहे.  \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मराठेशाहीच्या काळातील अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध वाडे आणि घराण्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेणारा दस्तऐवज म्हणजे ‘ऐतिहासिक वाडे व घराणी’ हे पुस्तक. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठेशाहीच्या वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या शासकांच्या पदरी असणारी, वेगवेगळ्या जाती-धर्माची घराणी यामध्ये आहेत. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसरदार, शास्त्री-पंडित, शाहीर, वतनदार, पाटील-देशमुख, सावकार, आदिवासी समूहाचा नाईक इत्यादी घराण्यांचा आणि त्यांच्या वाड्यांचा माहितीपूर्ण वेध या पुस्तकात घेतला आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाडे आणि त्यांचे स्थापत्य, त्यांचा संदर्भासहित इतिहास, स्वतः लेखकाने काढलेल्या दीडशेहून अधिक दुर्मिळ वस्तूंचे आणि वाड्यांच्या छायाचित्रांचा समावेश यात आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाही प्रचलित दंतकथा, आख्यायिका, नातेसंबंध आणि परंपरा, वर्तमानातील वाड्यांची स्थिती, मन अस्वस्थ करणारे वास्तव आणि काही रंजक किस्सेही या पुस्तकाचे आकर्षण आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"sakal media pvt ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":50302128357596,"sku":null,"price":520.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Aitihasik_Wade_V_Gharane_FC.webp?v=1779117284","url":"https:\/\/ganam.in\/products\/aitihasik-wade-ani-gharane-by-sumit-dengale","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}