madhushree publication
Aagryahoon Sutakecha Tharar आग्र्याहून सुटकेचा थरार By Ankur Chudhari अंकुर चौधरी
Aagryahoon Sutakecha Tharar आग्र्याहून सुटकेचा थरार By Ankur Chudhari अंकुर चौधरी
Couldn't load pickup availability
आग्र्यात पोहोचलेल्या शिवाजी महाराजांच्या दृष्टीने, निधड्या छातीने शत्रूच्या गुहेत प्रवेश करणे ही गोष्ट नवीन नव्हती. मिर्झा राजे जयसिंगाने आपल्या वचनाची पूर्तता केल्याचे पाहून औरंगजेबाला समाधान वाटले होते. शिवाजी महाराजांना चारीमुंड्या चीत करण्याचे त्याचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्नरंजन आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे, असे वाटून तो कमालीचा खूश झाला होता. आग्र्याच्या लाल किल्ल्यात दोन शत्रू समोरासमोर उभे ठाकले होते.दरबारात जाणीवपूर्वक मागच्या स्थानावर उभे करून आपला पाणउतारा करण्याचा औरंगजेबाचा डाव शिवाजी महाराजांनी उधळून लावला. त्यांनी भर दरबारात बाणेदारपणे दिलेल्या आव्हानामुळे औरंगजेब सर्द झाला. त्याने तातडीने दरबार बरखास्त केला. शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले. दिवस पुढे सरकत गेले. दरम्यान शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्यांनी पाठवलेल्या पत्रांमुळे चंचल स्वभावाचा औरंगजेब अधिकाधिक उतावळा आणि अस्थिर होत गेला. त्याने महाराजांना ठार मारण्याचा गोपनीय कट रचला. मात्र त्याआधीच शिवाजी महाराजांनी एका अकल्पनीय धाडसी मोहिमेचे नियोजन केले आणि हजारो मुघल सैनिकांच्या कडेकोट बंदोबस्तातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन ते स्वराज्याकडे निघाले. आग्र्याला जाण्याचा मिर्झा राजे जयसिंगाचा प्रस्ताव शिवाजी महाराजांनी का स्वीकारला ? शिवाजी महाराज, औरंगजेब आणि मुघल दरबार यांच्या दरम्यान कोणते नाट्य घडले ? अत्यंत क्रूर मुघल बादशाहच्या तावडीतून शिवाजी महाराजांनी अत्यंत धाडसाने व चतुराईने आपली सुटका कशी करून घेतली ? ऐतिहासिक घटनांपासून स्फूर्ती घेऊन लिहिलेली रोचक कादंबरी.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.