{"title":"Wari Speical","description":"\u003ch2\u003e\u003cstrong\u003eWari Speical\u003c\/strong\u003e\u003c\/h2\u003e","products":[{"product_id":"vari-by-vyankatesh-madgulkar-4","title":"Vari वारी  By Vyankatesh Madgulkar व्यंकटेश माडगूळकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअर्जुना पंढरीची ‘वारी’ करून पुन्हा आपल्या खोपटात आला होता, ...पण पांडुरंगाचं दर्शन न घेताच. जंगलाच्या वाटेवरील ‘वाटसरूं’चा कर्दनकाळ ठरणारा भाल्या धनगर, ...पण एका जिगरबाज फौजदाराच्या हाती लागला. ‘तळ्या’मुळे गावचा विकास झाला, सरकारने नुकसान भरपाई दिली, ...पण गावचं सगळं गेलं. उमा रामोशाने दुष्काळातही गाईचा सांभाळ केला, ...पण दारूच्या नशेत त्याच्या हातून ‘पाप’ घडलं. वीस वर्षे जे कुटुंबाचे दु:ख होते, तेच त्या बहिणीचेही दु:ख होते, ...पण आज एकाएकी ती श्रीमंत झाली होती. रेल्वेतनं येताना एका आंधळ्याची ‘सोबत’ होती, ...पण तरीही मंजुळा घरी पोहोचली नाही. ‘जन्मगाठी’च्या बंधनात अडकण्यास रंगनाथ तयार झाला होता, ...पण त्याने जन्मात लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अर्जुना, भाल्या, उमाजी, भालू, मंजुळापासून... रंगनाथपर्यंत ‘वारी’तील वारकऱ्यांचा हा जीवनप्रवास!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"New","offer_id":43519953600732,"sku":"KJ","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/products\/Rv0TFvPCcW.jpg?v=1665511562"},{"product_id":"shri-vithal-ek-mahasamanvay-by-r-c-dhere","title":"Shri Vithal Ek Mahasamanvay By R C Dhere","description":"\u003cstrong\u003eShri Vithal Ek Mahasamanvay By R C Dhere\u003c\/strong\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"New","offer_id":43519956222172,"sku":"KJ","price":810.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/products\/lrOWJDg8uz.jpg?v=1665511573"},{"product_id":"sant-tukaramancha-santvishayak-drushtikon-by-dr-ravindra-bembare","title":"Sant Tukaramancha Santvishayak Drushtikon By Dr. Ravindra Bembare","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएका संतवृत्तीच्या माणसाने लिहिलेले हे पुस्तक \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्वत:ला संत म्हणवणार्‍यांनी संतत्वाविषयी निर्माण केलेल्या संभ्रमाच्या काळात येत आहे, ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. लेखक रवींद्र बेम्बरे संत  धुंडामहाराज देगलूरकरांच्या नावानं ओळखल्या जाणार्‍या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहा योगायोगही मला महत्त्वाचा वाटतो. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया लेखनाला भावनेचा ओलावा असला तरी शास्त्रकाट्याची संशोधन कसोटी तंतोतंत पाळलेली दिसते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eपुस्तकाच्या शीर्षकात तुकाराम असला तरी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसर्व संतांनी केलेला संतविचार आपल्यासमोर \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमांडलेला आहे. संत कसा नसावा ते आधी मांडून \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसंत कसा असावा ते नंतर सांगितले आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसंतांचं सोंग पांघरून असंत उजळ माथ्याने समाजात वावरतात \u003c\/span\u003e\u003cspan\u003eही समस्या सर्व काळात सारखीच असते, असे हे लेखन वाचताना जाणवत राहते. ती तुकारामाच्या आधी होती, तुकारामाच्या काळात होती आणि आजही आहे. त्यामुळं संतांचा असंतविचार आजही समकालीनच वाटत राहतो. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाचे वाचन ही एका अर्थाने संत-संगतीच आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक सामान्य वाचक, संशोधक आणि सांप्रदायिक \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया सर्वांना सारखाच आनंद देईल, याची मला खात्री वाटते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- इंद्रजित भालेराव\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":43625470886108,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/products\/Sant_Tukaramancha_Drushtikon_FINAL-500x500.jpg?v=1668706699"},{"product_id":"deartukoba-by-vinayak-hegade","title":"DearTukoba डियर तुकोबा  By Vinayak Hegade विनायक होगाडे","description":"\u003cp\u003eतुकारामायण’, ‘मीडिया ट्रायल ऑन तुकोबा’ आणि\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘डियर तुकोबा’ अशा तीन रुपात विनायक होगाडे यांनी त्यांना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eझालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज ते\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या मनात विचारांचे हिंदोळ-कल्लोळ मातविणारे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचारशेंवर वर्षांआधी तुकोबांनी आपल्यात पेरलेली सांस्कृतिक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजनुके आजही आपल्यात वाहती असल्याने तुकोबा समकालीनच\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआहेत, हे ढळढळीत सत्य होय. म्हणून होगाडे यांनी काळाची\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाही मोडतोड, खेचाखेच केली आहे असे अजिबातही वाटत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनाही. आज ज्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि मानसिक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्थितीत एक समूह म्हणून आपण जगत आहोत, त्या वर्तमानात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुकोबांची अशी आठवण होणे, करणे आवश्यकच आहे, हे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहोगाडे यांनी फार प्रत्ययकारी प्रकारे केले आहे. आधीच्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकविता आणि अखेरीचे स्फुट यांच्या बळावर ही ‘ट्रायल’ फार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसामर्थ्याने उभी करून होगाडे यांनी फार वेधक आणि महत्वाचे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसांस्कृतिक जागरण मांडले आहे. या जागरणाचा एक श्रोता\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणून मी अंतःकरणापासून त्यांचे अभिनंदन व स्वागत करतो\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि त्यांना शुभेच्छा देतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– रंगनाथ पठारे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत\u003c\/p\u003e","brand":"madhushree publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":43703592747228,"sku":"","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/products\/images_3.jpg?v=1672595703"},{"product_id":"tukaram-by-bhalchandra-nemade","title":"Tukaram By Bhalchandra Nemade","description":"\u003cp\u003eभालचंद्र नेमाडे यांचे ‘तुकाराम’ हे मूळ इंग्रजी पुस्तक साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ ह्या मालेसाठी लिहिलेले होते. प्रस्तुत पुस्तक हा त्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ‘तुकाराम’ हे पुस्तक नेमाडे यांच्या साध्या, सरळ, अर्थवाही व निस्संदिग्ध भाषाशैलीमळे नेमाडे यांना अगदी सुरुवातीपासूनच असलेल्या खास मराठी परंपरेच्या तीव्र भानामुळे, बारीकसारीक महत्त्वपूर्ण नेमक्या तपशिलाच्या मांडणीमळे. बौद्धिक शिस्तीमळे. निश्चित वैचारिक भूमिकेमुळे, आधुनिकतेची परंपरेशी योग्य व संतुलित सांगड घालण्याच्या त्यांच्या अस्सलतेमुळे व तुकारामावरील अस्सल आणि अकृत्रिम प्रेमामुळे महत्त्वाचे झालेले आहे\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":43715040575708,"sku":"","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/products\/TukaramMockup.jpg?v=1673028088"},{"product_id":"punha-tukaram-by-dilip-purshottam-chitre","title":"Punha Tukaram By Dilip Purshottam Chitre","description":"","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":43896023122140,"sku":"","price":490.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/products\/IMG_20230420_094532.jpg?v=1681964146"},{"product_id":"katha-panduranga-by-bharat-bhushan","title":"Katha Panduranga कथा पांडुरंग  By Bharat Bhushan भारत भूषण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभगवान विठ्ठलाप्रती भक्ती आणि शरणागतीचा भाव असलेल्या या महिन्यात, भरत भूषण लिखित 'कथा पांडुरंग' (Katha Panduranga) हे पुस्तक सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. गेल्या पाच शतकांहून अधिक काळापासून, पंढरपूरचा 'विठोबा' हा मध्य भारतातील आणि विशेषतः दख्खनमधील लोकांच्या नितांत भक्तीचा केंद्रबिंदू राहिला आहे. विठोबा हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे एक अविभाज्य आणि मुख्य अंग आहेत. आळंदी-देहू ते पंढरपूर अशी लाखो भाविकांची पायी चालत होणारी वार्षिक 'वारी' म्हणजे या लाडक्या दैवताप्रती असलेल्या लोकांच्या प्रेमाचे आणि भक्तीचे अत्यंत पवित्र व दिव्य रूप अनुभवण्याची संधी असते. 'कथा पांडुरंग' हा काही विशेष वारकऱ्यांच्या कथांचा संग्रह आहे; हे पुस्तक आपल्या साधेपणातून वारीचा अनुभव थेट आपल्या घरात आणि हृदयात पोहोचवते. यातील कथा आध्यात्मिक समाधान देणाऱ्या आहेत आणि त्या यात्रेचा परिसर व परंपरांशी एकनिष्ठ राहतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":43930010058972,"sku":"","price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/katha_panduranga_front.jpg?v=1684297835"},{"product_id":"peshawakalin-pandharpur-by-raja-memane","title":"Peshawakalin Pandharpur By Raja Memane","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePeshawakalin Pandharpur By Raja Memane\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":46773818032348,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/76df9db2-abdf-41a9-a518-6e9f04cf5c37.jpg?v=1753466962"},{"product_id":"wari-ek-anandyatra-वारी-एक-आनंदयात्रा-by-sandesh-bhandare-संदेश-भंडारे","title":"Wari Ek Anandyatra वारी एक आनंदयात्रा By Sandesh Bhandare संदेश भंडारे","description":"\u003cp\u003eपुंडलिकाने जशी आपल्या आई-वडिलांना बरोबर घेऊन वारी केली व त्यांना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचंद्रभागेत स्नान घातले, वारकरी आज आपल्या आई-वडिलांची तशीच सेवा करताना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदिसतात. 2001 साली आषाढी एकादशीला मी गेलो असताना हे दृश्य मला दिसले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवारीपरंपरेमध्ये असणारी सेवाभावी वृत्ती या छायाचित्रात पकडता आली याचा मला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआनंद वाटला. छायाचित्रात दिसणारा वृद्ध वारकरी पाणी अंगावर पडताना शांत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्ताने डोळे मिटून समाधान अनुभवत होता. पायी वारी केल्यानंतरच्या या स्नानाने\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या चेहर्यावर समाधान दिसत होते. आठशे वर्षाच्या या वारीपरंपरेचा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछायाचित्रात्मक शोध घेण्याची प्रेरणा या छायाचित्राने मला मिळाली. ‘वारी एक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआनंदयात्रा’ हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर माझी छायाचित्रात दिसणार्या शंकर भैरू\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगाडे या गडहिंग्लज तालुक्यातील वारकर्याशी भेट झाली. त्यांना स्नान घालणारी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eती माणसे त्यांच्या कुटुंबातील नव्हती. एवढेच नाही, तर ते त्यांच्या ओळखीचेदेखील\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनव्हते, ना ते एका दिंडीतील होते, हे त्यांच्याकडून मला समजले. वडिलधारी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यक्ती एकटीच स्नान करताना पाहून ती व्यक्ती आपल्याच कुटुंबातील असे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमजून इतर वारकर्यांनी त्यांना स्नान घातले. रक्ताचे नाते नसतानाही\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवडिलधार्या व्यक्तीला आपले वडील समजून स्नान घालताना टिपलेला हा प्रसंग\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यामुळे एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला.\u003c\/p\u003e","brand":"manovikas prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51913271247068,"sku":null,"price":430.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/51tGUG-BvqL.jpg?v=1783015482"},{"product_id":"vithoba-missing-in-pandharpur-विठोबा-मिसिंग-इन-पंढरपूर-by-vinayak-hogade-विनायक-होगाडे","title":"Vithoba MIssing In Pandharpur विठोबा मिसिंग इन पंढरपूर By Vinayak Hogade विनायक होगाडे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविनायक होगाडे हा आधुनिक जाणिवेतून परंपरेचा नवा अन्वयार्थ लावत आजचा खारवटलेला काळ पकडू पाहणारा तरुण लेखक आहे, याचा प्रत्यय ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ या त्याच्या कादंबरीतून येत राहतो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानला जाणारा विठ्ठल एके दिवशी अनपेक्षितपणे गायब होतो आणि सर्वत्र एकच गहजब उडतो, या भन्नाट कल्पनेचं बोट पकडून विनायक होगाडेने या फॅन्टसीसदृश कादंबरीची रचना केली आहे. काळाची सरमिसळ करत एकाच वेळी केलेले ऐतिहासिक आणि आधुनिक काळातील व्यक्तिरेखांचे कल्पक उपयोजन, तसेच ओघवत्या शैलीत सहजपणे येणारा विठ्ठल, पंढरपूर यांसह वारकरी संतांचा इतिहास, त्यांविषयी लोकमानसात रुजलेली मिथके, कहाण्या, ही या कादंबरीचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणता येईल. या अद्भुत कथनाच्या माध्यमातून त्याने मराठी समाज आणि संस्कृतीच्या लाजिरवाण्या भूतकाळाची आणि त्याचबरोबर सडत चाललेल्या वर्तमानाची सालपटं काढून आपल्यासमोर मांडली आहेत. हे जितकं धाडसाचं आहे, तितकंच ते समकालाची चिकित्सा करण्याच्या दृष्टीने आवश्यकही आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंत विचारांचा आजच्या काळाने केलेला पराभव, त्यातून जाणवणारे नैतिक मूल्यांचे स्खलन आणि संवेदना जिवंत असलेल्या एखाद्या विठोबाची यामुळे होणारी घुसमट, हे सगळे वाचकाला विलक्षण अस्वस्थ करते. आपल्या लेखकत्वाचे भान असलेल्या आणि संत परंपरेतून गवसलेल्या शब्दांचे व मूल्यांचे सामर्थ्य जाणून असलेल्या या लेखकाची ही कादंबरी मराठी कादंबरीच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, हे निश्चित.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रवीण दशरथ बांदेकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"madhushree publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":51913410183388,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/5_e2848ae5-23a7-4a0f-b3b0-9fa8b5a26c3e.png?v=1783016165"},{"product_id":"tuka-mhaneतुका-म्हणे-by-sadanand-more-सदानंद-मोरे","title":"Tuka Mhaneतुका म्हणे By  Sadanand More सदानंद मोरे","description":"\u003cdiv data-expanded=\"true\" class=\"a-expander-content a-expander-partial-collapse-content a-expander-content-expanded\"\u003e\u003cspan\u003eसंतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनास ३५० वर्ष पूर्ण होत असण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात अनेकांनी आपापली सेवा तुकारामचरणी रूजू केली. दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’ मधून ‘तुका म्हणे’ हे सदर जवळजवळ वर्षभर चालवून मीही माझा वाटा उचलला. प्रस्तुत कृती या सदराला दिलेले पुस्तकरूप आहे. त्याचे श्रेय महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्री. कुमार केतकर आणि उत्कर्ष प्रकाशनचे श्री. सुधाकर जोशी यांना आहे. त्यांचे व या सदरावर प्रेम करणाऱ्या वाचकांचे मनापासून आभार.\u003cbr\u003eसदर सुरू करण्यापूर्वी काही वर्षे अगोदर माझा ‘तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ असाच म्हणजे ‘साप्ताहिक सकाळ’ मधील सदरातून सिद्ध झाला होता. त्यात श्रीतुकोबा हे मराठी संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेले संस्कृतीपुरुष असल्याचे प्रतिपादन केले होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ मधील अभंगांची निवड केवळ आध्यात्मिक वा पारमार्थिक दृष्टिकोणातून केलेली नसून तुकोबांच्या विचारांचे व व्यक्तित्वाचे अनेक पैलू दिसावेत अशा तऱ्हेने केलेली आहे. या पैलूंचाच प्रभाव मराठी संस्कृतीवर आहे.\u003cbr\u003eप्रयत्न, प्रतिभा आणि प्रसाद अशी तीन काव्यकारणे असल्याचे प्रतिपादन प्राचीन काव्यमीमांसकांनी केलेले आहे. मात्र प्रासादिक कवींची उदाहरणे फारशी आढळत नाहीत. तुकोबा आपली कविता प्रसादातून निर्माण झाली असल्याचे नि:संदिग्धपणे सांगतात. हा प्रसाद देवाचा व संतांचा असा दुहेरी आहे.\u003cbr\u003e‘‘पांडुरंगे केले स्वप्नामाजी जागे।\u003cbr\u003eसरवे पांडुरंगे येवोनिया।।\u003cbr\u003eसांगितले काम करावे कवित्व।\u003cbr\u003eवाउगे निमित्त बोलो नये।।”\u003cbr\u003eतसेच\u003cbr\u003e“नामदेवा पायी तुक्या स्वप्नी भेटी।\u003cbr\u003eप्रसाद हा पोटी राहिलासे।।”\u003cbr\u003eतुकोबांची वाणी ही अशाप्रकारे प्रासादिक आहे. म्हणजे त्यांना कवित्वशक्ती ईश्वराने दिलेली आहे.\u003cbr\u003e‘‘माझ्या मुखे मज बोलवितो देव।\u003cbr\u003eअर्थ गुह्य भाव तोचि जाणो।।”\u003cbr\u003eआपण या ईश्वराचे प्रेषित आहोत, निरोपे आहोत आपले म्हणजे अधिकृत ईश्वरी संदेश आहे.\u003cbr\u003e“आता येथे कैसा तुका।\u003cbr\u003eबोले सिका स्वामीचा।।”\u003cbr\u003eतुकोबांच्या या दाव्यामुळे त्यांच्यावर सनातनी पंडितांचा रोष होणे साहजिक होते. तुकोबांच्या वचनांना समकालिन गुणग्राहक ‘तुकाराम वेद’ म्हणू लागले होते त्यामुळे व ‘‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा” अशा तुकोबांच्या आव्हानात्मक अभिव्यक्तीमुळे असे व्हायचेच होते. पण त्यातून तुकोबांचे कवित्व तावून, सुलाखून, झळाळून बाहेर पडले. त्याची लोकप्रियताच एवढी होती की सोलोमालो सारख्याला त्याची नक्कल करण्याचा मोह आवरला नाही. ‘अभंगवाणी प्रसिद्ध तुकायाची’ असे समीकरण रूढ झाले. “तुकारामाचे अभंग लाघवी रामा मजेवरी गात जा” असे सगनभाऊ आपला साथीदार रामा गोंधळी याला सांगतो तर दुसरीकडे मोरोपंतांसारखा संस्कृतनिष्ठ कवीसुद्धा तुकोबांच्या अभंगाशिवाय कीर्तनच शक्य नाही अशी भूमिका घेतो.\u003cbr\u003eतुकोबांचे हे आकर्षण इंग्रजी काळातही टिकून राहिले. प्रार्थना समाजाच्या रानडे भांडारकरांसारख्या धुरीणांनी आपल्या नवभागवत संप्रदायाची उभारणी तुकोबांच्या अभंगांच्या आधारे करून तुकोबा जगद्गुरु असल्याचे घोषित केले.\u003cbr\u003eस्वातंत्र्योत्तर काळात तर दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्यासारख्या वैश्विक जाणीवेच्या कवीने तुकोबांचे कवी म्हणून जागतिक पातळीवर स्थान किती वरचे आहे याचे दर्शन घडवले.\u003cbr\u003eवारकरी परंपरेचे कळस झालेल्या मराठीपणाचा आदर्श असलेल्या आणि तरीही साऱ्या सीमा ओलांडून वैश्विक आवाहनक्षमता असलेल्या तुकोबांच्या अभंगांचे हे एक ओझरते दर्शन.\u003cbr\u003e- सदानंद मोरे\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"a-expander-header a-expander-partial-collapse-header\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"utkarsh prakshan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51913546891484,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/IMG_9030_1024x1024_b3292e4e-19c9-462b-8d77-4f271fcb21fa.webp?v=1783016955"},{"product_id":"tukaram-darshan-तुकाराम-दर्शन-by-sadanand-more-सदानंद-मोरे","title":"Tukaram Darshan तुकाराम दर्शन By  Sadanand More सदानंद मोरे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतुकाराम वारकऱ्यांपुरता मर्यादित नाही; तो रोजच्या जगण्यात सोबत करणारा, आपल्यासारखाच धडपडणारा मित्र आहे; पण यापलीकडे जाऊन जीवनाचे साध्य काय असावे याची मांडणी करणारा तत्त्वज्ञ आहे आणि तिथे पोहोचण्यास मदत करणारा मार्गदर्शकही आहे. महाराष्ट्रातील विचारवंतांना, नेत्यांना प्रेरणा देणाऱ्या तुकारामाच्या अभंगांनी मराठी भाषेला समृद्ध केले आणि सर्वसामान्यांना जगण्यासाठी ऊर्जा दिली. तुकाराम आणि महाराष्ट्र वेगळा करून पाहता येतच नाही, याचे भान देणारा ग्रंथ.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"sakal media pvt ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":51913596141788,"sku":null,"price":720.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Tukaram_Darshan_Front_cover.webp?v=1783017278"},{"product_id":"tuka-aakashaevadhaतुका-आकाशाएवढा-by-suresh-garjeसुरेश-गर्जे","title":"Tuka Aakashaevadhaतुका आकाशाएवढा By Suresh Garjeसुरेश गर्जे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगद्गुरू  तुकाराम महाराजांनी लिहिलेले चार हजार दोनशे अभंग उपलब्ध आहेत. हे अभंग अर्थपूर्ण व विठ्ठलभक्तीने ओतप्रोत आहेत.  प्रा. सुरेश गर्जे लिखित 'तुका आकाशाएवढा'   या चिंतनपर पुस्तकात तुकाराम महाराजांच्या निवडक  ४१ अभंगांचा भावार्थ सांगण्यात आला आहे. संत तुकाराम महाराजांची भाषा त्या काळातील समाजाला साजेशी होती. मात्र, त्यातील गर्भितार्थ लेखकाने अत्यंत साध्या, सोप्या भाषेत सामान्यांना आकलन होईल अशा पद्धतीने उलगडला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे. लेखकाने या अभंगांच्या केलेल्या विवेचनातून महाराजांचे श्रेष्ठत्व तर समजतेच, पण संत तुकाराम महाराज हे जगद्गुरू का आहेत, याची खऱ्या अर्थाने उकल होते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"saket prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51913633923292,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/TukaAkashaevdhya_front.webp?v=1783017517"},{"product_id":"santashreshtha-dnyanadev-jeevan-ani-karya-संतश्रेष्ठ-ज्ञानदेव-जीवन-आणि-कार्य-by-v-l-manjul-वा-ल-मंजूळ","title":"Santashreshtha Dnyanadev : Jeevan Ani Karya संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य By V. L. Manjul वा ल मंजूळ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e•भारतीय इतिहास, संस्कृती व परंपराविषयक संदर्भ-साधनांचे ज्येष्ठ संकलक वा. ल. मंजूळ यांनी चितारलेल्या ‘संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य’ या चरित्राने संतसाहित्याच्या अभ्यासामध्ये नव्याने भर पडली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•संत ज्ञानदेवांच्या आयुष्यातील चमत्कारिक घटना-प्रसंग यांचा सश्रद्ध चिकित्सेद्वारे अभ्यास करण्याची गरज लेखकाने यातून सूचित केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘हरिपाठ’ आणि संकीर्ण अभंग या ज्ञानदेवांच्या सर्वपरिचित साहित्यसंपदेबरोबर ‘ज्ञानदेव’ अशी नाममुद्रा असलेल्या अन्य ४५ रचनांचा तपशील यामध्ये सादर केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•ज्ञानदेवांच्या चरित्रावरील सोळा इंग्रजी ग्रंथ उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांच्या साहित्याचा काही विदेशी अभ्यासकांनी अभ्यास केला आहे. त्यांचा परिचय स्वतंत्र प्रकरणाद्वारे पुस्तकात दिला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी शैव-वैष्णव संप्रदायाचा संगम जुळवून आणला. त्यातून कोणती स्थित्यंतरे झाली, याचे आणि पालखी सोहळ्याचे यथार्थ वर्णन यामध्ये आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•ज्ञानदेवांच्या चरित्रविषयक प्रकाशित-अप्रकाशित, तसेच मराठी, संस्कृतबरोबरच देशी-विदेशी भाषांतील संदर्भसाहित्याचे दालन वा. ल. मंजूळ यांनी याद्वारे आपल्या पुढे खुले केले आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"sakal media pvt ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":51929973686492,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/BK00589.webp?v=1783102477"},{"product_id":"vari-swaroop-ani-parampara-वारी-स्वरुप-आणि-परंपरा-by-dr-ramchandra-dekhane-डॉ-रामचंद्र-देखणे","title":"Vari : Swaroop Ani Parampara वारी : स्वरुप आणि परंपरा By Dr. Ramchandra Dekhane डॉ. रामचंद्र देखणे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकविला. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003eएकात्मतेची दिंडी निघाली. \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eसमतेची पताका खांद्यांवर फडकली. \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eग्रंथातील अद्वैतता कृतीत उतरली. \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eभक्तीच्या पेठेत अद्वैतभावाची देवाण - घेवाण झाली. \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eसदाचाराचा व्यापार फुलला आणि 'अवघाचि संसार' सुखाचा झाला. \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eचैतन्यरूप प्रब्रह्म्हाला  साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्नत वाटचाल, म्हणजे वारी \u003c\/div\u003e","brand":"padamagandha prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51930001113308,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/519rh9sNjIL.jpg?v=1783102877"}],"url":"https:\/\/ganam.in\/collections\/wari-speical.oembed","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}